Gold Rate : अर्थसंकल्पापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली जाणून घेऊयात.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 30, 2025, 01:48 PM IST
Gold Rate : अर्थसंकल्पापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचा भाव  title=

Gold,Silver Rate Today: फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 च्या (Union Budget 2025)  आधी सोन्याच्या किमतींनी आज इतिहास रचला आहे. सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दुपारी 12 वाजता जारी झालेल्या IBJA दरानुसार, 24 कॅरेट सोन्याने 81000 रुपये प्रति 10 ग्रॅम पार केले आहे. त्याचवेळी चांदी 91600 रुपये किलो दराने आज विकली जाईल. 22 कॅरेट सोन्याचा भावही 74202 रुपयांवर पोहोचला असून 18 कॅरेट सोन्याचा भावही 60755 रुपयांवर पोहोचला आहे. हा दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) जारी केला आहे, ज्यामध्ये GST समाविष्ट नाही. तुमच्या शहरात 1000 ते 2000 रुपयांचा फरक असू शकतो. आजचा दिल्लीतील सोन्याचा भाव 83000 रुपये आहे. लाइव्ह मिंटनुसार, आजचा दिल्लीतील सोन्याचा भाव 83033 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काल हा दार 82413 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

सोन्याच्या दरात मोठी वाढ

अर्थसंकल्पापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. 1 जानेवारी 2025 ला 10 ग्रॅम सोन्याचा दर 79390 रुपये होता. महिनाभर हा दर वर-खाली होत होता. ज्वेलर्स अन् रिटेलर्सकडून मोठ्या संख्येनं खरेदी सुरु असल्यानं 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 83750 रुपयांवर पोहोचला आहे. हा दर ऑल इंडिया सर्राफा असोसिएशननंकडून आला आहे.

लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणीही वाढली

2025 मध्ये सोने 5260 रुपयांनी महागले आहे. या वर्षी आतापर्यंत सोने 5260 रुपयांनी महागले आहे. तर चांदीही 5583 रुपयांनी महागली आहे. 31 डिसेंबर 24 रोजी सोने 76045 रुपये प्रति 10 आणि चांदी 85680 रुपये प्रति किलो दराने उघडले. या दिवशी सोने 75740 रुपये होते. चांदीचा भावही 86017 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्यामुळे सोन्याची खरेदी वाढली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणीही वाढली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x