सर्वसामान्यांना उपवास करणंही पडणार महागात; साबुदाण्याच्या किंमतीत मोठी वाढ

श्रावण महिना सुरू झाल्याने तसेच सणासुदीच्या दिवसांमुळे साबुदाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीत वाढ झाल्याने साबुदाण्याच्या दरांत किरकोळ बाजारात 10 दिवसांत प्रति किलो सरासरी 10 रुपयांनी वधारला आहे. 

Updated: Jul 29, 2022, 09:52 AM IST
सर्वसामान्यांना उपवास करणंही पडणार महागात; साबुदाण्याच्या किंमतीत मोठी वाढ title=

मुंबई : श्रावण महिना सुरू झाल्याने तसेच सणासुदीच्या दिवसांमुळे साबुदाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीत वाढ झाल्याने साबुदाण्याच्या दरांत किरकोळ बाजारात 10 दिवसांत प्रति किलो सरासरी 10 रुपयांनी वधारला आहे. 

साबुदाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांगल्या दर्जाच्या साबुदाण्याची 63 ते 65 रुपयांनी आणि मध्यम दर्जाच्या साबुदाण्याची 60 ते 62 रुपयांनी किरकोळ विक्री होते आहे. 

उत्पादनातील घट, श्रावण महिन्यामुळे मागणीत झालेली वाढ आणि 5 टक्के जीएसटी कर या कारणांमुळे साबुदाण्याच्या दरात प्रतिकिलो 10 रुपयांनी वाढ झाली आहे. 

डाळ, तांदूळ, पीठ साखरेच्या किंमतीत वाढ

पाकिटबंद अन्नपदार्थांवर GSTलावल्यानंतर डाळ, तांदूळ, पीठ, साखर यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडला आहे.

 पिठच्या किंमतीत प्रति किलो 3 रुपयांनी वाढ झालीये. तर तांदूळ 10 आणि डाळी 20रुपयांनी महागल्यात..