भाजीच्या पिशवीची किंमत दीड लाखात.... नक्की या पिशवीत आहे तरी काय?

 तुमच्या आजी-आजोबांना कापडी पिशवी घेऊन बाजार करायला गेल्याचे तुम्ही पाहिले असेल. ती कापडी पिशवी तशी फारशी महाग नसावी.

Updated: Aug 30, 2021, 07:12 PM IST
भाजीच्या पिशवीची किंमत दीड लाखात.... नक्की या पिशवीत आहे तरी काय? title=

मुंबई : तुम्ही जुन्याकाळीत लोकांना जसे तुमचे आजी-आजोबांना कापडी पिशवी घेऊन बाजार करायला गेल्याचे तुम्ही पाहिले असेल. ती कापडी पिशवी तशी फारशी महाग नसावी. त्याकाळात तर त्याची किंमत कदाचित 2 ते 5 रुपयांपर्यंत असावी. परंतु आता आपण तशा जुन्या चौकटीच्या कापडी पिशव्या वापरत नाही, आपल्याला त्याची लाज वाटते. परंतु तुम्हाला जर असे सांगितले की, सध्या बाजारात तशीच कापडी बँग आली आहे. ज्याची किंमत 2000 डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 1 लाख 54 हजार रुपये आहे? तुम्हाला हे वाचून धक्का बसेल आणि तुमचा यावर विश्वास देखील बसणार नाही. परंतु हे खरं आहे.

खरे तर आपण हे अनेकदा पाहिले आहे की, जुन्या गोष्टी नव्याने आपल्यासमोर फॅशन म्हणून पुन्हा येतात. तशीच ही पिशवी आता बॅगेच्या रुपात फॅशन म्हणून आली आहे. परंतु त्याची किंमत ऐकून मात्र समोरच्याला चक्कर येईल.

तुमच्या मनात असा विचार नक्की आला असेल की, आता या लाखो रुपयांच्या पिशवीचा काय उपयोग? आणि असं काय त्यात आहे, ज्यामुळे त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे? पण तुम्हाला हे देखील जाणून आश्चर्य होईल की, त्यात तसे इतके खास काहीच नाही. ती एक साधी बॅग आहे. परंतु ती फक्त एका मोठ्या ब्रँडची बॅग असल्याने त्याची किंमत इतकी जास्त आहे.

Balenciaga नावाचा एक लक्झरी ब्रँड आहे. ज्याने  'देसी किराणा पिशवी' ला पुन्हा एकदा फॅशन म्हणून बाजारात आणले. ज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे.

खरेतर Balenciaga  ही पॅरिस आधारित लक्झरी ब्रँड आहे, ज्याला त्याच्या यूनिक संग्रहासाठी जगभरात ओळखले जाते. या ब्रँडच्या साइटवर विविध प्रिंट आणि रंगांमध्ये बॅगा उपलब्ध आहेत. या सर्वांची किंमत लाखात आहे.

इन्स्टाग्राम वापरकर्ता @whysaharsh ने या बॅगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याचबरोबर या बॅगची किंमत देखील त्याने सांगितली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "Balenciaga ही बॅग (Pishvi) 2000 डॉलर्समध्ये मध्ये विकत आहे आणि ही अशी गोष्ट आहे, ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता."

ही बॅग सोशल मीडियावर शेअर होताच सर्वत्र या बॅगेचीच चर्चा सुरू झाली. अनेक लोकांनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एका व्यक्तीने लिहिले - माझ्याकडे आधीच 6 पडलेले आहेत, ज्याला मी आता 2000 डॉलर्सला विकणार.

तर दुसऱ्याने लिहिले - माझी आजी, आई आणि काकू यांच्याकडे अशा पिशव्यांचे चांगले संग्रह आहे.

काही लोकांनी अशा ही कमेंट्स केल्या की, भाज्यांची पिशवी इतकी महाग कशी असू शकते. यानंतर अनेकांनी या गोष्टीचा आनंद घ्यायला आणि त्याचे मीम्स बनवायला सुरुवात केली आहे.