'भारतानं अद्वितीय योद्धा गमावला..." म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक

MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला स या आपघातामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी

Updated: Dec 8, 2021, 07:15 PM IST
'भारतानं अद्वितीय योद्धा गमावला..." म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक title=

चेन्नई : तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथं वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. कुन्नूरमधल्या जंगल भागात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.  हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला भीषण लागली. या अपघातात देशाचे पहिले chief of defence staff बिपीन रावत यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेमध्ये 13 मृतदेह आतापर्यंत सापडल्याची माहिती मिळाली आहे.  त्यांची DNA चाचणीद्वारे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत मोठं नुकसान झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचं निधन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत ट्विट केलं आहे. बिपीन रावत यांचा फोटो शेअर करत मोदी यांनी लिहिले, 'जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, त्यांनी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन अपवादात्मक होता. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती.'

राजनाथ सिंग

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील आपलं दु:ख व्यक्त करत ट्वीटरवर याबद्दल ट्वीट शेअर केलं आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, 'तामिळनाडूमध्ये आज झालेल्या एका अत्यंत दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 सशस्त्र दलाच्या जवानांच्या आकस्मिक निधनामुळे खूप दुःख झाले. त्यांचे अकाली निधन हे आपल्या सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.'

अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्तं केलं आहे.  याबाबत त्यांनी ट्वीट करताना ते म्हणाले ' हा देशासाठी एक अतिशय दु:खद दिवस आहे. कारण आम्ही आमचे CDS, जनरल बिपिन रावत जी यांना एका अत्यंत दुःखद अपघातात गमावले आहे. ते शूर सैनिकांपैकी एक होते, ज्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचे अनुकरणीय योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही. ही बातमी ऐकून खुप दु:ख झालं.'

शरद पवार

NCP प्रमुख शरद पवार यांनी या घडलेल्या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त करत सोशल मीडियावरती ट्वीट केलं आहे. 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. त्यांची कारकीर्द अतिशय सुशोभित होती आणि गेल्या चार दशकांतील त्यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना.'

जनरल विजय कुमार सिंग

जनरल विजय कुमार सिंग यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत ट्वीट  केलं आहे, 'आज आपण एका दुर्घटनेत देशाचा एक शूर आणि प्रतिष्ठित सैनिक गमावला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू होणे अत्यंत दु:खद आहे. त्यांची देशासाठी केलेली सेवा महत्त्वाची होती आणि सदैव स्मरणात राहील. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.'

राहुल गांधी

राहुल गांधी यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत ट्वीट दिली आहे. 'मी जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. ही एक अभूतपूर्व शोकांतिका आहे आणि या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांच्यासोबत या अपघातात आपले प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही संवेदना व्यक्त करतो. या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे.'