Small Savings Scheme : छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारचं गिफ्ट

केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेसाठी (Small Saving Scheme) नवीन व्याजदर (Intrest Rate) जाहीर केले.    

Updated: Sep 29, 2022, 10:20 PM IST
Small Savings Scheme : छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारचं गिफ्ट title=

Small Saving Scheme : सुकन्या समृद्धी योजना, FD, किसान विकास पत्र यांसारख्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेसाठी (Small Saving Scheme) नवीन व्याजदर (Intrest Rate) जाहीर केले. सरकारने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदरात 30 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. या घोषणेनंतर पोस्ट ऑफिसमधील 3 वर्षांच्या मुदत ठेवी सध्याच्या 5.5 टक्क्यांवरून 5.8 टक्के झाल्या आहेत. (big news central government incresed intrest rate on small saving scheme kvp ssy)

व्याजदरात वाढ

सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 7.4% वरून 7.6%, किसान विकास पत्रासाठी 6.9% वरून 7% आणि 2 आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींसाठीच्या व्याजदरात वाढ केली आहे. एवढेच नाही तर किसान विकास पत्राबाबतच्या (Kisan Vikas Patra) कार्यकाळातही बदल करण्यात आला आहे. आता 7 टक्के व्याजदरासह KVP ची मॅच्युरिटी 123 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

या योजना जैसे थे

दुसरीकडे बचत ठेवी, 1 वर्ष, 5 वर्षीय FD, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NCS), सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. कारण व्याजात कोणताही बदल झाला नाही. या योजनांचे दर केले गेले नाहीत. या योजनांच्या गुंतवणूकदारांना पूर्वीप्रमाणेच व्याजदर मिळत राहतील.