कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका; CBSE बोर्डाच्या दहावी, बारावी निकालासंदर्भात सर्वात मोठी अपडेट

CBSE बोर्डाच्या दहावी, बारावी निकालासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकालासंदर्भात जाहीर झालेले परिपत्रक फेक असल्याे उघड झाले आहे. 

Updated: May 1, 2024, 07:47 PM IST
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका; CBSE बोर्डाच्या दहावी, बारावी निकालासंदर्भात सर्वात मोठी अपडेट title=

CBSE Board Class 10th 2024 Result Viral Notice :  1 मे 2024 रोजी  CBSE बोर्डाचा दहावी निकाल जाहीर होईल असे परिपत्रक व्हायरल झाले होते. या व्हायरल परिपत्रकामागचे खरे सत्य समोर आले आहे. CBSE बोर्डाने सोशल मिडायद्वारे या परिपत्रकाबाबतचा खुलासा केला आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेले परिपत्रक फेक असल्याचे समोर आले आहे.  

देशभरात CBSE बोर्डाचे लाखो विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत.  5 फेब्रुवारी 2024 ते 13 मार्च 2024 या कालावधीत CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. तर, CBSE  बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. 

CBSE बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल 1 मे रोजी जाहीर होईल असा दावा करणारी एक नोटिस सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तारखेसह निकाल जाहीर होण्याची वेळही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेय. 1 मे 2024 रोजी 1:00 ते दुपारी 3:00 दरम्यान दहावीचा निकाल जाहीर होईल.  अधिकृत वेबसाइट - CBSE रिजल्ट पोर्टलवर निकाल पाहता येईल असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
 

व्हायरल झालेले परिपत्रक फेक असल्याचा खुलासा

CBSE बोर्डाच्या निकालासंदर्भात व्हायरल झालेले परिपत्रक फेक असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. अशा प्रकारचे कोणतेही परिपत्रक प्रसिद्ध  करण्यात आले नसल्याचा खुलासा CBSE बोर्डाकडून करण्यात आला आहे. निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही असे देखील CBSE बोर्डाकडून  स्पष्ट करण्यात आले आहे. या व्हायरल पत्रातील माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे.  यामुळे अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहन CBSE बोर्डाकडून  करण्यात आले आहे.