Crime News : बिहारच्या (bihar) आरामध्ये भाजप (BJP) नेत्यासह पत्नीची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते निवृत्त प्राध्यापक महेंद्र सिंह आणि त्यांच्या पत्नीची सोमवारी आराच्या नवादा पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या घरात निर्घृण हत्या करण्यात आलीय (Arrah Wife Husband Murder). निवृत्त प्राध्यापक महेंद्र सिंह हे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्षही होते आणि त्यांचे राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याशी जवळचे संबंध होते. खुनाच्या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांच्या हत्येमुळे भाजप नेत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथके घटनस्थाळी दाखल झाली असून तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांना घरातील एकाचा मृतदेह खोलीत तर दुसऱ्याचा मृतदेह व्हरांड्यात सापडला होता. भिंतींवर ठिकठिकाणी रक्ताच्या थारोळ्या होत्या. सध्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथकाने तपास सुरु केला आहे. त्यामुळे दोन्ही पती पत्नींनी स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
भाडेकरुने फोन करुन दिली माहिती
पती-पत्नीचे मृतदेह वेगळ्या ठिकाणी आढळून आले आहेत. घरात कोणीही जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला नसल्याचे दिसून येत आहे. ओळखीच्या व्यक्तीने घरात प्रवेश करुन हत्या केली असावी. महेंद्र सिंह यांच्या भाडेकरूने फोन करुन आम्हाला घटनेची माहिती दिली, असे एसपी प्रमोद कुमार यादव यांनी सांगितले.
डॉ.महेंद्र प्रसाद सिंग हे वीर कुंवर सिंग विद्यापीठातून प्राध्यापक पदावरून निवृत्त झाले होते . तर त्यांच्या पत्नी पुष्पा सिंग या आराच्या महिला महाविद्यालयातून प्राध्यापक पदावरून निवृत्त झाल्या होत्या. डॉ. महेंद्र प्रसाद सिंह हे 1982-83 च्या सुमारास बिहारमधील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. निवृत्तीनंतर, महेंद्र सिंग हे कटिरा येथील त्यांच्या निवासस्थानी राहत होते.