Lovers Caught And Beaten: बिहारमधील रक्सौल येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका विवाहित माहिलेला तिच्या प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर गावकऱ्यांनी तिला भयानक शिक्षा दिली. या महिलेला आणि तिच्या प्रियकराला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच या दोघांचे केसही गावकऱ्यांनी कापले. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली आणि त्यांनी कारवाई केली.
हा संपूर्ण प्रकार रक्सौल येथील रामगढवामधील एका गावात घडला आहे. येथील गावकऱ्यांनी या विवाहित महिलेला तिच्या प्रियकराबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. त्यानंतर या दोघांनाही गावकऱ्यांनी विजेच्या खांबाला बांधलं आणि बेदम मारहाण केली. या महिलेच्या लहान मुलांसमोरच तिला मारहाण करण्यात आली. आईला होणारी मारहाण पाहून ही मुलं रडत होती तरी गावकऱ्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही. गावकरी या दोघांना मारहाण करत राहिले. बराच वेळ या दोघांना मारहाण करण्यात आली. लाकडू, दांडकी, बांबूंनी या दोघांना मारहाण केली गेली.
या दोघांना बेदम मारहाण करुन झाल्यानंतरही गावकऱ्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी या दोघांचेही केस कापले. हा संपूर्ण प्रकार कोणीतरी मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आणि या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणीची पोलिसांमध्ये तक्रार करण्याऐवजी गुरुवारी रात्री हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी गावात पंचायत भरवण्यात आली. गावातील ज्या तरुणांनी हा व्हिडीओ आपल्या कॅमेरात कैद केला त्यांनाही तो व्हिडीओ डिलीट करण्यास सांगण्यात आलं. मात्र हा व्हिडीओ त्यापूर्वीच व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओची पोलिसांनी स्वत: दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणामध्ये रामगढवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीसहीत 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या महिलेचं समोपदेशन केलं जाणार आहे. या महिलेला आवश्यक ती सर्व आरोग्य सुविधा आणि न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाईसाठी मदत केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा फोटो...
मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला नसता तर या अत्याचाराला कधी वाचाच फुटली नसती, असं काहींनी म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये आणखीन कोणकोण सहभागी होतं. पंचायतीमधील पंचांनी खरोखर हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला का, गावातील तरुणांच्या मोबाईलमध्ये अन्य काही व्हिडीओ आहेत का या साऱ्याचा तपास आता पोलीस करत आहेत.