दिवसा अभ्यास, रात्री पुस्तकातून... विद्यार्थ्याचे कारनामे पाहून पोलीसही हैराण

चित्रपटालाही लाजवेल असा प्रकार, विद्यार्थ्याची गुन्हा करण्याची पद्धत पाहून पोलीस चक्रावले, मोठं रॅकेट असण्याची शक्यता

Updated: Dec 20, 2022, 02:16 PM IST
दिवसा अभ्यास, रात्री पुस्तकातून... विद्यार्थ्याचे कारनामे पाहून पोलीसही हैराण title=
प्रतिकात्मक फोटो

Crime News : गुन्हा करण्यासाठी आरोपी कोणत्या क्ल्पुत्या शोधून काढतील याचा नेम नाही. विशेषत: दारू व्रिकेते यात एक पाऊल पुढे असतात. दारुच्या अवैध विक्री आणि खरेदीवर रोक लावण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करतात. पण दारु पिण्यासाठी आणि विकण्यासाठी लोकं नवनवे फंडे शोधून काढतात. अभिनेता शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटाली एक सीन तुम्हाला आठवतोय. या चित्रपटात शाळेत असताना शाहरुख खान दप्तरातून दारू लोकांपर्यंत पोहोचवत असतो. या दृष्याला अगदी  साजेशी घटना समोर आली आहे

अवैध दारू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पुस्तकात दारू लपवून ग्राहकांपर्यंत होम डिलिव्हरी (Home delivery of liquor) करणाऱ्या एका टोळीचा बिहार पोलिसांनी (Bihar Police) पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी एका विद्यार्थ्याच्या (Student) दप्तरातून पोलिसांना दारूच्या बाटल्या सापडल्या. पण हा एकच विद्यार्थी नव्हता. तर याची व्याप्ती फार मोठी होती, अवैध दारू विक्रीच्या धंद्यात अनेक विद्यार्थी गुंतले असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. 

BPSC परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्याता आलेला विद्यार्थी एका प्रसिद्ध कोचिंग इन्स्टीट्यूटमध्ये शिक्षण घेतो. या कोचिंग इन्स्टीट्यूटच्या (Coaching Institute) माध्यमातून दिवसा हा विद्यार्थी BPSC परीक्षेची तयारी करतो. पण रात्र होताच हा विद्यार्थी हाजीपूरमध्ये दारू पुस्तकात लपवून त्याची होम डिलिव्हरी करतो. अटक करण्यात आलेला विद्यार्थी हा सोनपूरमध्ये राहणारा आहे. हाजीपूरमध्ये एका घरात डिलिव्हरी देण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली.

विद्यार्थ्याच्या डोळ्यात अश्रू
पोलिसांनी अटक केल्यानंत विद्यार्थ्याच्या डोळ्यात अश्रू आले. आपण खूप गरीब कुटुंबातले असून शिकण्याची इच्छा आहे, पण शिकण्यासाठी पैसे नसल्याने आपण या रॅकेटमध्ये फसल्याचे या विद्यार्थ्याने सांगितलं. काही मित्रांनी त्याला या धंद्यात चांगले पैसे मिळण्याचं आमिष दाखवलं. याला भुलून विद्यार्थ्याने अवैध दारू विक्रि सुरु केली. छपार विषारी दारू कांडानंतर पोलिसांनी आक्रमक कारवाईला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी छापेमारी केली असून अशाच एका कारवाईत या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली.

विद्यार्थ्याला अटक केली असली तरी पोलीस यात आणखी तपास करत आहेत. यामागे एखादं मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहेत. तसंच आणखी किती विद्यार्थ्यांना या जाळ्यात ओढण्यात आलं आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत.