Shocking News : पती-पत्नीची जोडी स्वर्गात ठरली जाते असं म्हटलं जातं, सात जन्म हीच पत्नी किंवा हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली जाते. पण एक महिलेने स्वत:हून आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून दिलं. (Wife Remarried her Husband) यामागचं कारण फारच धक्कादायक होतं, हे प्रकरण बाहेर येताच पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. देशाची राजधानी दिल्लीतली (Delhi) ही घटना आहे. या महिलेने दुसऱ्या लग्नासाठी पतीला बिहारमधल्या भागलपूर (Bhagalpur, Bihar) इथं पाठवलं. तिथे तिच्या पतीने एका अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. दुसऱ्या पत्नीला घेऊन तो व्यक्ती दिल्लीत आपल्या घरी आला. पण ज्यावेळी दुसरी पत्नी पतीच्या दिल्लीतल्या घरो पोहोचली. त्यावेळी तिला मोठा धक्का बसला.
पतीचं यााधी लग्न झालं होतं, आणि त्याची पहिली पत्नी त्याच घरात राहात होती. दुसऱ्या पत्नीने ही कोण आहे विचारल्यावर पतीने आपली पत्नी असल्याचं सांगितलं. हे ऐकून मुलीच्या पाया खालची जमीन सरकली. तीने या गोष्टीला विरोध केल्यावर तिला धमकवण्यात आलं. पहिली पत्नी असताना दुसरं लग्न का केलं असं त्या मुलीने विचारल्यावर दिल्लीत मोलकरीण मिळत नाही, म्हणून तुला लग्न करुन इथं आणल्याचं धक्कादायक उत्तर तिला देण्यात आलं. याविरोधात पोलिसात तक्रार करु असं सांगितल्यावर पहिल्या पत्नीने आणि पतीने तरुणीला जबर मारहाण केली.
'विरोध केलास तर मारून टाकू'
पहिली पत्नी आणि पतीच्या मारहाणीला कंटाळून तरुणी आपल्या माहेरी गेली. तिथे तीने आपल्या वडिलांसह जगदीशपुर पोलीस ठाण्यात पहिली पत्नी आणि पतीविरोधात तक्रार नोंदवली. आपली फसवणूक करण्यात आल्याचं तीने या तक्रारीत म्हटलं आहे. आपलं लग्न मुंगेर तालुक्यातील खडगपूर ठाणे क्षेत्राील रहिवासी हिरालाल दास याच्याशी करुन देण्यात आलं. लग्नानंतर हिरालाल मला घेऊन दिल्लीला गेला. तिथे गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचं कळलं. हिरालालचं पहिलं लग्न झालं होतं, संगीता असं या पहिल्या पत्नीचं नाव असून दोघांनी संगनमताने हा कट रचला होता. संगीताने हिरालालचं लग्न यासाठी करुन दिलं होतं, कारण घरात त्यांना मोलकरीण हवी होती, असं पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
इतकंच नाही तर घरातील कामं केली नाहीस आणि हे बाहेर कोणाला सांगितलंस तर मारून टाकू अशी धमकीही हिरालाला आणि संगीताने पीडित मुलीलाल दिली होती. याप्रकरणी हिरालाल आणि संगातीला अटक करावी अशी मागणी पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांनी केली. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी हिरालाल आणि संगीताल या पती-पत्नीला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.