close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या रॉयचा घटस्फोट

12 मे ला पटनामध्ये धुमधडाक्यात त्यांचं लग्न झालं होतं. 

Updated: Nov 2, 2018, 07:54 PM IST
तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या रॉयचा घटस्फोट

पटना : आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरातील वातावरण सध्या गढुळ झालेलं दिसतंय. लालूंचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आपली पत्नी ऐश्वर्या रॉयशी घटस्फोट घेणार आहे. यासाठी त्याने कौटुंबिक न्यायालयात अर्ज देखील सादर केलायं. तेजप्रताप आणि ऐश्वर्या गेल्या चार महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याचे वृत्त सुत्रांच्या हवाल्याने मिळालं आहे. या दरम्यान ऐश्वर्या आपले वडिल चंद्रिका रॉय यांच्यासोबत राबडी देवी यांच्या घरी पोहोचली तर दुसरीकडे तेजप्रताप लालूंच्या भेटीसाठी रांची रवाना झाले आहेत. 

घटस्फोटासाठी अर्ज

तेजप्रताप आणि ऐश्वर्यामध्ये लग्नानंतर भांडण सुरू झाल्याचे सांगण्यात येतंय. यामुळे त्याने ऐश्वर्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतलाय.

त्याने पटनाच्या नागरी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलायं.

लालुंचा मोठा मुलगा तेजप्रताप आणि चंद्रिका रॉय यांची मुलगी ऐश्वर्या यांच 5 महिन्यांपूर्वीचं लग्न झालं होतं.

12 मे ला पटनामध्ये धुमधडाक्यात त्यांचं लग्न झालं होतं.

यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. या लग्नासाठी लालूंना पॅरोल देखील देण्यात आला होता.

ऐश्वर्या राजकारणात येणार असल्याच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी आल्या होत्या.