बिहारचे लोकंच बिहारला बदनाम करतात - नितीश कुमार

बिहार बोर्डाचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमारने म्हटलं आहे की, चोरी थांबवल्यामुळे असा निकाल लागला आहे. टॉपर स्कॅमला फेटाळत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, बिहारमध्ये शिक्षणात सुधार आणण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये तो सुधारु.

Updated: Jun 5, 2017, 02:13 PM IST
बिहारचे लोकंच बिहारला बदनाम करतात - नितीश कुमार title=

पटना : बिहार बोर्डाचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमारने म्हटलं आहे की, चोरी थांबवल्यामुळे असा निकाल लागला आहे. टॉपर स्कॅमला फेटाळत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, बिहारमध्ये शिक्षणात सुधार आणण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये तो सुधारु.

नीतीश कुमारांनी म्हटलं की, या स्कॅमच्या माध्यमातून बिहारला बदनाम केलं जात आहे. बिहारचे लोकंच बिहारला बदनाम करत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, 'खराब निकालापासून आम्ही धडा घेवू. परीक्षा कडकपणे घेतली गेली म्हणून निकाल खराब आला. २०१७ मध्ये आर्ट्सचा  टॉपर गणेश कुमारला वयाची माहिती लपवल्यामुळे अटक झाली आहे.

नीतीश कुमारांनी म्हटलं की, तमिनाडु़मध्ये एका भर्ती परीक्षेत हरियाणाचा मुलगा टॉपर आला. सीबीआय त्याची चौकशी करत आहे. पण याची चर्चा नाही झाली. पण अशा प्रकारच्या घटना समाजातील लोकंच घडवतात. कोणी असा दावा नाही करु शकत की सिस्टममध्ये गडबड आहे.