अतिउत्साही मंडळींनी हा व्हिडीओ पाहाच, असा वाढदिवस साजरा करणं पडू शकतं महाग

वाढदिवस असा साजरा करताना ही काळजी घ्या! या मुलासोबत काय घडलं पाहा व्हिडीओ

Updated: Jul 11, 2021, 08:57 PM IST
अतिउत्साही मंडळींनी हा व्हिडीओ पाहाच, असा वाढदिवस साजरा करणं पडू शकतं महाग   title=

मुंबई: बऱ्याचदा वाढदिवस म्हटलं की घरचे आणि मित्रमंडळी अति उत्साहात असतात. अशा परिस्थितीत जोशात आपल्याच माणसाला इजा होईल असं काहीतरी घडतं आणि त्या दिवसाचा विचका होतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये अति उत्साह चिमुकल्याच्या जीवावर बेतताना थोडक्यासाठी वाचला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणि त्यावर स्पार्किंग कॅण्डल लावण्यात आली. गिटार वाजवून त्याला हॅपी बर्थडे म्हणण्यात आलं. झोपेच्या तंद्रित असलेला चिमुकला पटकन उठून त्या केकवर पडतो. 

हा व्हिडीओ पाहताना दोन सेकंद आपलाच श्वास रोखला जातो. सुदैवानं स्पार्किंग कॅण्डल त्याच्या चेहऱ्याला लागत नाही. तो त्या केकमध्ये पडताच त्याला समोरचा व्यक्ती मागे खेचतो. दैव बलवत्तर म्हणून त्याला कोणतीही इजा झाली नाही. मात्र अशा प्रकारचे अति उत्साह घातक ठरू शकतात. त्यामुळे काळजी घेणं केव्हाही योग्य आहे.

नाहीतर वाढदिवसाचा विचका होऊ शकतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 119.3 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर अनेक युझर्सनी अशा प्रकारच्या स्पार्कल कॅन्डल्स न वापरण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुलांच्या बाबतीत अशी जोखीम उचलणं खूप धोक्याचं असल्याचं काही युझर्सनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

Tags: