घटस्फोटाच्या टोकाच्या निर्णयानंतर 'या' एका कारणामुळे मिटला नवरा-बायकोमधील वाद

बहुतेकदा लोकं रागात टोकाचा निर्णय घेतात पण प्रत्येक वेळेला तो बरोबरच असतो असे नाही.

Updated: Jul 11, 2021, 08:39 PM IST
घटस्फोटाच्या टोकाच्या निर्णयानंतर 'या' एका कारणामुळे मिटला नवरा-बायकोमधील वाद title=

बैतूल : घराघरात पतीपत्नीमध्ये वाद हे होत असतात. काही वाद इकते मोठे असतात की, जे घटस्फोटातून संपतात. तर काही वाद हे छोटेमोठे असतात जे पती-पत्नी आपापसात मिळून संपवतात. पंरतु मध्यप्रदेशातील बैतूर येथील या पती-पत्नीमधील वाद थोडा वेगळा आहे. जो कदाचीत घटस्फोट घेण्याऱ्या जोडप्यांना विचार करायला लावू शकतो. कारण बहुतेकदा लोकं रागात टोकाचा निर्णय घेतात पण प्रत्येक वेळेला तो बरोबरच असतो असे नाही.

गेल्या 3 वर्षांपासून किरकोळ घरगुती वादामुळे स्वतंत्रपणे राहत असलेले पती-पत्नी आज बैतूल येथे राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये एकत्र आले आहे. ज्यांनी आपापसातील वाद एका मोठ्या गोष्टीसाठी संपवला आणि एकत्र आले. आपल्यातील किरकोळ वाद संपवून  पती-पत्नीने कोर्टाच्या वकिलांच्या सल्ल्यानंतर केवळ एकत्र राहण्याची शपथच घेतली नाही, तर एकमेकांना पुष्पहार घालून एकत्र राहण्याचे वचन देखील दिले.

बैतूलजवळील देवगावमध्ये राहणारी गोवर्धन नरे आणि त्यांची पत्नी सीमा नारे यांच्यात अनेकदा वाद झाले. हे वाद इतके वाढले की 3 वर्षांपूर्वी सीमा नारे तिची दोन मुले आणि तिच्या नवऱ्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली. इतकेच नाही तर, तिने पती गोवर्धन नारे यांच्याविरूद्ध बैतूलच्या न्यायालयात खटलाही दाखल केला.

मुलांचे भविष्य घडविण्यासाठी एकत्र

कोर्टातील दोघांमधील वादामुळे दोघांच्या आयुष्यातील सुख-शांती उध्वस्त झाली. त्याचबरोबर त्यांच्या मुलांचे भविष्यही धोक्यात आले. पण आज हे जोडपे बैतूल येथे झालेल्या राष्ट्रीय न्यायालयामध्ये पुन्हा एकत्र आले. या न्यायालयामध्ये जेव्हा त्यांच्या वकिलांनी आणि न्यायाधीशांनी जेव्हा त्यांच्या मुलांच्या भविष्याबद्दल काही गोष्टी समजावल्या त्यानंतर त्यांनी आपले पुढील आयुष्य प्रेमाने व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्यातील वाद संपवण्याचा निर्णय घेतला.

यानंतर दोन्ही पती-पत्नीमध्ये तडजोड करुन वाद मिटवले. त्यानंतर वकिलांनी आणि न्यायाधीशांनी एकमेकांना पुष्पहार घालून घरी पाठविले. या सगळ्या प्रकरणावर पत्नी सीमा म्हणाली की, "प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरुव आमचे भांडण व्हायचे जे मारामारीपर्यंत पोहोचायचे. पण आता सल्लामसलत झाल्यानंतर आम्ही एकत्र राहू." तसेच तिच्या नवऱ्याने सांगितले की, "आम्ही आज आमच्यातील मतभेद विसरलो आहोत. यापुढे आम्ही आमच्या मुलांच्या चांगल्या भविष्याबद्दल विचार करु आणि ते घडवू."