राजस्थानमध्ये दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म

बाळाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी 

Updated: Jan 21, 2020, 08:48 AM IST
राजस्थानमध्ये दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म  title=

मुंबई : राजस्थानमधील पाली जिल्ह्यात एका खासगी रूग्णालयात महिलेने चक्क दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. कंबरेच्यावर दोन शरीर असलेल्या या बाळाला दोन डोकं, दोन हातांसोबत दोन पोट असून हा भाग एकत्र चिकटलेला आहे. 

डॉक्टर शोभा वर्मा यांच्या नर्सिंग होममध्ये या महिलेची प्रसुती झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेची जुळ्यांना जन्म दिला आहे. रविवारी रात्री सिझेरिअनच्या माध्यमातून प्रसूती करण्यात आली. यामध्ये एक बाळ अगदी सुदृढ असून दुसरं बाळ प्रीमॅच्युअर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 वर्षांत पहिल्यांदाच अशी बाब समोर आली आहे. आता या बाळाला ईएमएसमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र यांना लवकर जोधपुरमध्ये हलवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 

दोन तोंडाच्या बाळाची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. या बाळाला बघण्यासाठी लोकांनी भरपूर गर्दी केली असून रूग्णालयात बघ्यांची प्रचंड गर्दी होत आहे. 29 वर्षीय मादाराम देवासी नावाच्या महिलेने या दोन तोंडी बाळाला जन्म दिला आहे. रविवारी रात्री या महिलेची प्रसूती झाली आहे. दोन बाळांपैकी दोन तोंड असलेल्या बाळाची प्रकृती सध्या नाजूक आहे. 

या घटनेमुळे बाळाच्या प्रकृती आणि महिलेच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. एकच शरीर असलेल्या या बाळाला कंबरेच्यावर दोन तोंड आहेत. हे बाळ पाहण्यासाठी स्थानिक प्रचंड गर्दी करत आहेत.