राहुल गांधींची खिल्ली उडविण्याची भाजपाची आयडिया फसली

  राहुल गांधीं यांची खिल्ली उडविण्याची भाजपाची शक्कल आतापर्यंत खूप सफल झाली. पण ही शक्कल आता काम करत नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी सांगितले आहे.

Updated: Oct 22, 2017, 08:58 PM IST
राहुल गांधींची खिल्ली उडविण्याची भाजपाची आयडिया फसली title=

नवी दिल्ली :  राहुल गांधीं यांची खिल्ली उडविण्याची भाजपाची शक्कल आतापर्यंत खूप सफल झाली. पण ही शक्कल आता काम करत नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यात कॉंग्रेस उपाध्यक्षाला प्रभावी विरोधी म्हणून पाहिले जात आहे. तसेच त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल पहायला मिळत असून भाजपा सरकारच्या कामकाजाबद्दल 'संशय' व्यक्त केला जात आहे.

भाजपाला पर्याय म्हणून लोक कॉंग्रेसकडे पाहत असल्याचे थिरुवनंतपुरममध्ये लोकसभा सदस्यांनी सांगितले. लोकांच्या विचारात परिवर्तन झाले आहे. हे असेच राहिले तर पुढच्या घटना या कॉंग्रेसच्या बाजूने घडतील असेही थरुर यांनी सांगितले.

केरळ आणि गुजरात राज्यांमधे काढलेल्या प्रचार फेऱ्या अयशस्वी ठरल्याचे ते म्हणाले.लोकांनी आपल्या वचनांची पूर्तता करण्यासंबधी विचारण्यास सुरूवात केली आहे. एप्रिल आणि मे २०१४ च्या तुलनेत लोक आमच्याकडे अधिक अपेक्षेने बघत असल्याचे थरुर यांनी यावेळी सांगितले.

थरुर यांचे हे विधान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. यावरुन राहुल गांधी हे लवकरच कॉंग्रेसची धुरा संभाळतील अशी चिन्हे आहेत.

राहुल गांधी हे जर मुख्य पदावर आले तर पार्टीमध्ये नवचैतन्य संचारेल असे सांगत अजून निवडणूकांना वेळ असून कॉंग्रेसबद्दलची विश्वसनियता वाढेल असेही थरुर यांनी सांगितले.