मुंबई : भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची मान्सून सत्र बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासमवेत पार्टीतील वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी इटावा येथील खासदार अशोक दोहरे हात जोडत पंतप्रधानांच्या दिशेने आले. पंतप्रधानांनीही त्यांना हात जोडून अभिवादन केले तेव्हा खासदार अचानकपणे पंतप्रधानांच्या पाया पडायला खाली वाकले पण पंतप्रधानांनी त्यांना असं करू दिलं नाही.
आपल्या कोणी पाया पडू नये असे आदेश पंतप्रधानांनी याआधीच खासदार आणि आमदारांना दिले आहेत. एवढंच नव्हे तर 'सन्मानासाठी मोठमोठे बुके देण्याऐवजी गुलाबाचं फुल द्या' असेही त्यांनी सांगितले. तुम्हीही पाहीलं असेल पंतप्रधान मोदी ज्या राज्यात जातात तिथे एअरपोर्टवर त्यांच औपचारिक स्वागत केवळ एक गुलाबाच फुल देऊन केलं जातं.
पीएम के पैर छूने वाले सांसद की पीठ पर ऐसी जमी धौल कि आई दूर तक आवाज़!! pic.twitter.com/VklGQTlFGI
— Akhilesh Sharma (@akhileshsharma1) July 31, 2018
तुम्हाला माहितेय का ? इटावाचे खासदार आणि दलित नेता अशोक दोहरे तेच आहेत ज्यांनी गेल्या काही दिवसात यूपी सरकारने नाराज होऊन पंतप्रधानांना तक्रार करणारे पत्र लिहिले. २ एप्रिलला 'भारत बंद'नंतर यूपीसहित इतर राज्यातील एससी/एसटी वर्गातील लोकांना स्थानिक पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवल्याचे त्यांनी म्हटले. पोलीस निर्दोषांना जातिसूचक शब्द वापरून मारहाण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलायं. यामुळे या वर्गात राग आणि असुरक्षेची भावना वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले. यावर्षी २ एप्रिलला दलितांनी 'भारत बंद' पुकारला होता.