भाजपाची साईट डाऊन : काँग्रेसने उडवली खिल्ली, 'आप'नेही घेतली फिरकी

भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचा वापर खूप प्रभावीपणे करते. 2014 च्या निवडणूकीत भाजपाच्या विजयात सोशल मीडियाचा महत्त्वाचा वाटा होता.

Updated: Mar 6, 2019, 01:23 PM IST
भाजपाची साईट डाऊन : काँग्रेसने उडवली खिल्ली, 'आप'नेही घेतली फिरकी

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचा वापर खूप प्रभावीपणे करते. 2014 च्या निवडणूकीत भाजपाच्या विजयात सोशल मीडियाचा महत्त्वाचा वाटा होता. याआधी कोणत्या पक्षाने इतक्या प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर केला नव्हता. भाजपाचे नेतेही सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात. त्यानंतर कॉंग्रेस, आम आदमी पक्षानेही आपल्या सोशल मीडियाचा वापर वाढवण्यास सुरूवात केली. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अव्वल समजल्या जाणाऱ्या भाजपाची साईट बंद पडली आहे. या संधीचा फायदा घेत विरोधकांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सनी त्यांची खिल्ली उडवली आहे. 

Image result for congress zee news

भाजपाची साईट मंगळवार पासून डाऊन आहे. यावरून कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडल वरून त्यांची खिल्ली उडवली आहे. भाजपाच्या साईटवर केल्यावर 'आम्ही लवकरच परत येऊ, आता काही मेंटेनंसचे काम सुरू आहे' असा संदेश वाचायला मिळतो. याचा स्क्रीनशॉट शेअर करत काँग्रेसने संधीचा फायदा घेतला आहे. भाजपाला मदतीची गरज असल्यास सांगावे असे त्यात म्हटले आहे. 

काँग्रेसकडून एक अधिकृत ट्वीट करण्यात आले. सुप्रभात भाजपा, 'तुम्ही खूप वेळा पासून डाऊन आहात, जर तुम्हाला मदतीची गरज असेल तर आम्ही आनंदाने मदत करु', असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. आता यामध्ये भर पडली ती आम आदमी पक्षाची.. आम आदमी पक्षाने आपला जुना राग यातून काढला. आणि कॉंग्रेसला उद्देशला म्हटले..'ज्याप्रकारे तुम्ही दिल्लीमध्ये त्यांची मदत केली'... आपची ही एक ओळ बरेच काही बोलून गेली. 'या निवडणूकीत भाजपा कुठेही डाऊन झाली तर कॉंग्रेस त्यांची मदत करेल. जसे आम्ही म्हटले होते की कॉंग्रेस भाजपाची मदत करत आहे', असे 'आप'ने म्हटले. 

Image result for aap zee news

लोकसभा निवडणूकीसाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये युती न झाल्याकडे आपचा इशारा होता. आपला दिल्लीमध्ये कॉंग्रेस सोबत युती हवी होती. या संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये बोलणी देखील सुरू होती. पण दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिली दिक्षीत यांनी आपण स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कॉंग्रेस कोणासोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट झाले. या सर्वाचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे.