Black Friday Sale: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ब्लॅक फ्रायडे सेलची (black friday sale). आजपासून तो देशातही सुरू झाला आहे. ब्लॅक फ्रायडे सेल काय असतो तर ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे शॉपिंग (shopping). तुम्हाला ग्राहक म्हणून या दिवशी चांगले प्रकारे तुम्ही बचत करू शकता आणि स्वस्त प्रोडक्स विकत घेऊ शकता. सध्या नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ सुरू आहे म्हणजे लवकरच ख्रिसमस (Chrismas) आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन (New Year Celebration) करण्यासाठी सगळेच तयार असतात, उत्साही असतात. पाश्चात्त्य देशांमध्ये या सणांचे महत्त्व मोठे आहे. त्याचबरोबर ख्रिसमस आणि न्यू इयरच्या आधी येतो तो अजून एक सण आणि तो म्हणजे थॅंक्सगिविंगचा (Thanksgiving). अमेरिकेत थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होतो. ख्रिसमसच्या तयारीची आणि खरेदीची सुरुवात म्हणून याकडे पाहिले जाते ज्यादरम्यान अनेक मोठे ब्रँड आणि स्टोअर्स ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देतात. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी जंगी सेलिब्रेशनचा (celebration) असतो. लोकं आपल्याकडील पैसे खर्च करतात आणि मोठे ब्रॅंड्सही खूप जास्त प्रमाणात पैसे कमवतात त्यामुळे सगळ्यांसाठी हा काळ आनंदाचा आणि कमावण्याचा असतो.
भारतातही हा सेल आजपासून (25 नोव्हेंबर) सुरू झाला आहे. तेव्हा भारततही मोठे ब्रॅंन्ड्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तमोत्तम ऑफर देतात. तेव्हा पाहूया की ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय आणि त्याचे म्हत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. त्याचबरोबर हेही जाणून घेऊया की कोणते ब्रॅंड्स भारतात मोठे सेल देणार आहेत. अॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart), विजय सेल्स (Vijay Sales), क्रॉमा (Croma) असे मोठे ब्रॅंण्ड्स सध्या आपल्या इथे चांगली सूट देत आहेत. ब्लॅक फ्रायडे सेल 2022 मध्ये लोकांना मोठ्या ब्रँड्सवर प्रचंड सूट मिळते. ही ऑफर प्रामुख्याने अमेरिकेत राहणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध असते पण भारतातही अनेक मोठ्या ब्रँड्सवर प्रचंड सूट उपलब्ध आहे.
अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी थँक्सगिव्हिंग साजरा केला जातो. या दिवशी अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी असते. ज्याचा दुसरा दिवस ब्लॅक फ्रायडे आहे. ब्लॅक फ्रायडे या वर्षी 25 नोव्हेंबरला आहे. या दिवशी होम केअर प्रोडक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि अन्य काही ब्यूटी प्रोडक्डक्सही यादिवशी चांगली सूट देतात. जेणेकरून ग्राहक येथे जास्त आकर्षित होतील. फक्त अशाच कंपन्या नाही तर ई-कॉमर्स वेबसाईट्सही यावेळी चांगली सूट देण्याचा प्रयत्न करतात.
समोर आलेल्या माहितीनूसार ब्लॅक फ्रायडेबद्दल वेगवेगळी माहिती समोर आली आहे. असं म्हटलं जातं की या दिवसाला ब्लॅक फ्रायडे या गोष्टींसाठी म्हटलं जातं कारण या दिवसात रिटेल बिझनेस खूप चांगल्याप्रकारे चालतो आणि त्याला चांगली गती निर्माण होते या काळात दुकानदारांना कुठलेच नुकसान होत नाही. त्यामुळे ब्लॅक फ्रायडे असे नावं या गोष्टीला पडलं आहे. फिलाडेल्फियाच्या पोलिसांकडूनही ब्लॅक फ्रायडे हे नावं पडल्याचं काही लोकांचे म्हणणे आहे. समोर अशीही माहिती आली आहे की ब्लॅक फ्रायडेचा आणि शॉपिंग किंवा खरेदीशीही काहीही विशेष संबंध नाही. 1950 च्या दशकात थँक्सगिव्हिंगनंतरच्या दिवसाच्या अराजकतेचे वर्णन करण्यासाठी फिलाडेल्फियामधील (philadelphia) पोलीस दलांनी ब्लॅक फ्रायडे हा शब्द वापरला. त्यावेळी फुटबॉल खेळासाठी शेकडो पर्यटक शहरात जमायचे आणि जी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतं.