5 dead in bolero tractor collision: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हरदोई (Hardoi) येथील पचदेवरा पोलीस स्थनकाच्या हद्दीतील दरियाबाद गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नरवदेवाला घेऊन जाणारी एका भरधाव बोलेरो आणि अनंगपूरवरुन येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या धडकेमुळे नियंत्रण सुटलेली बोलेरो बाजूच्या कालव्यामध्ये पडल्याने 5 जणांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांनी जागीच प्राण सोडला तर बोलेरोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी तीघांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं. मरण पावलेल्यांमध्ये नवरदेवाचाही समावेश आहे. हरपालपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कूडा गावावरुन वरात घेऊन शाहजहांपूर जनपद पोलीस स्थानकाच्या हत्तीतील कांटा अभयन परवा गावामध्ये बेलोरो जात असतानाच हा अपघात झाला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हटलं आहे. तसेच अधिकाऱ्यांना रुग्णलयामध्ये जाऊन जखमींना योग्य उपचार मिळत आहेत की नाही हे पाहण्याचे निर्देश दिले आहेत. नवऱ्या मुलाबरोबरच त्याचे वडील आणि मावस भावाचाही समावेश आहे. या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस निरिक्षक रुग्णालयामध्ये जखमींची भेट घेण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मरण पावलेल्या नवऱ्या मुलाचं नाव देवेश असं असून तो केवळ 21 वर्षांचा होता. देवशचं शुक्रवारी लग्न होतं. अनेक गाड्यांमधून लग्नासाठी वऱ्हाडी शाहजहांपूरमधील कांट पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अभयनपुर गावाला जात होतो.
अपघात झालेलेल्या बोलेरो गाडीमध्ये नवरदेवासहीत एकूण 8 जण होते. यापैकी नवरदेवाचा 12 वर्षीय भाचा रुद्रचा जागीच मृत्यू झाला. याचबरोबर नवरदेवाच्या बहिणीचा नवरा बिपनेश (45) यांचाही जागीच मृत्यू झाला. अन्य 6 जण या अपघातात जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपचारादरम्यान नवरदेव देवेश, त्याचे वडील ओमबीर आणि बोलेरो चालक सुमित यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर गाडीमधून प्रवास करणाऱ्या अंकित जगतपाल आणि राजेश यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. लग्नासाठी जाणाऱ्या एवढ्या तरुण मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने गावाकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.