रात्री उशिरा लेकीच्या खोलीतून आवाज आल्याने घरच्यांना संशय आला अन्..., त्यांनी दरवाजा उघडताच

रात्री उशिरा तरुण लेकीच्या खोलीतून आवाज येत होता. घरातील मंडळींना संशय आला...त्यांनी खोलीचा दरवाजा उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

नेहा चौधरी | Updated: Jun 22, 2024, 02:04 PM IST
रात्री उशिरा लेकीच्या खोलीतून आवाज आल्याने घरच्यांना संशय आला अन्..., त्यांनी दरवाजा उघडताच title=

एक विचित्र घटना समोर आली आहे. आई वडील घरात असतानाही तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला रात्री उशिरा घरी बोलवलं. घरातील सगळे सदस्य झोपले आहेत हे पाहून तिने एवढं मोठं धाडस केलं. पण लेकीच्या खोलीतून उशिरा रात्री विचित्र आवाज येत होते. घरातील मंडळींना संशय आला आणि नको त्या अवस्थेत लेकीला पाहवं लागलं. आज काल तरुण तरुणीचे लव्ह अफेयर ही काही नवीन गोष्ट नाही. आई वडिलांनाही बऱ्यापैकी आपल्या मुलांचे अफेयर आहेत हे माहिती असतं. पण लग्नापूर्वी आपल्या मुलांनी मर्यादा ओलांडू नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. पण हयातनगर समोर आलेल्या घटनेने आई वडिलांची लेकीला आपल्या बॉयफ्रेंडसोबत एका रुममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलंय. 

हयातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका तरुणाचे त्याच गावातील तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मंगळवारी रात्री हा तरुण गुपचूप तिच्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटण्यासाठी गेला. घरातील सर्व सदस्य झोपली आहेत, याचा फायदा घेत त्यांनी खोलीत भेटायचं ठरवलं. बिनधास्त घरात झोपलेल्या आई वडिलांचे डोळे अचानक उघडले. कारण त्यांना अचानक काही आवाज येत होते. त्यांना लेकीच्या खोलीतून तरुणाचा आवाज येत होता. शिवाय मुलीचा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यांना संशय आला आणि त्यांनी दोर ठोठावलं. 

लेकीने दरवाजा उघडल्यानंतर आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडल्यानंतर तरुणाला त्याच्या घरच्यांना बोलवण्यात आलं. या घटनेचा छडा लावण्यासाठी गावात पंचायत बोलवण्यात आली. बुधवारी दुपारपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये पंचायत फेरी सुरू होती, ज्यामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांनी दोघांच्या लग्नावर सहमती दर्शवली. त्यानंतर त्या दोघांचे त्वरित लग्न लावण्यात आले. 

तरुणीच्या नातेवाइकांनी सांगितले की, तरुणाला पकडल्यानंतर दोन्ही पक्षातील लोकांमध्ये पंचायत झाली. ज्यामध्ये दोघांनी लग्नाला होकार दिला. दोघांचेही लग्न झालं खरं पण लग्नानंतर वराच्या बाजूच्या लोकांनी त्यांना घेऊन जाण्यास नकार दिला. त्यावेळी दोन महिन्यांनी या दोघांना घेऊन जाऊ असं सांगितलं.