Breaking | बी एस येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; राजकीय घडामोडींना वेग

  कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे.

Updated: Jul 26, 2021, 12:50 PM IST
Breaking | बी एस येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; राजकीय घडामोडींना वेग

बंगळुरू :  कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे. त्यामुळे कर्नाटकतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.

त्यांनी राजीनामा देण्याआधी 35 मिनिटे भाषण केले. यादरम्यान त्यांच्या डोळ्यांत बऱ्याचदा अश्रू आले. आपण भाजपला राज्यात मोठं करण्यासाठी काय काय केलं. याबाबत भावना व्यक्त केल्या.

वाढत्या वयामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून येडियुरप्पा यांना राजीनामा देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुढील मुख्यमंत्री कोण
सूत्रांच्या मते कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून लिंगायत समाजाचे नेते मृगेश निरानी, बसवराज बोम्मई, वोक्कालिगा समाजाचे नेते अस्वथ नारायण, आर अशोक, सी टी रवी आणि प्रल्हाद जोशी यांच्या नावाची चर्चा आहे.