Viral Video: फोटोशूटमध्ये नवरा-नवरीचा संयम सुटला; केलं असं कृत्य की फोटोग्राफर...!

Wedding Photographer: लग्नसमारंभातील सगळे सुंदर क्षण टिपण्याच्या प्रयत्नात गुंग असलेल्या फोटोग्राफर्सच्या वाट्याला काही वेळा असे गंमतीदार प्रसंगही येऊ शकतात.  

Updated: Feb 5, 2023, 12:42 PM IST
Viral Video: फोटोशूटमध्ये नवरा-नवरीचा संयम सुटला; केलं असं कृत्य की फोटोग्राफर...!

Viral Video:  लग्न म्हणजे नवरा नवरीच्या आयुष्यातील खास दिवस. लग्न म्हटले की फोटोशूट अलेच. नवरा नवरीने केलेला नट्टापट्टा हा फोटोंसाठीच तर असतो. लग्नात फोटो काढणे यातही वेगळे मज्जा असते. फोटोग्राफरने सांगितलेल्या पोजेस देत नवरा नवरी लाजत का होईना फोटो काढत असतात. मात्र एका लग्नात एक भन्नाट प्रकार घडला आहे. या घटनेचा मजेशीर व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भर लग्नमंडपात नवरा-नवरीचे कृत्य पाहून फोटोग्राफरबरोबर जे घडल ते पाहून उपस्थित सर्वांना हसू कोसळले. 

सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या क्लिपमध्ये दिसत आहे कि, नवविवाहित कपल लग्नाच्या रिस्पेशन नंतर फोटोशूट करत आहेत. या फोटोशूट दरम्यान फोटोग्राफर नवरा-नवरीला किस करायला सांगतो. त्यानंतर नवरा-नवरी किस करायला सुरूवात करतात. फोटोग्राफरला नवरा-नवरीचा किसचे शूट मिळाले. मात्र नवरा-नवरी काय किस करायचे थांबत नाही. त्या दोघांचे किसिंग भर मंडपात सुरूच असल्याचे या व्हिडीओमधून दिसून आले. अखेर फोटोग्राफरला त्या दोघांना किस  करताना थांबवाव लागलं. तरी देखील नवरा-नवरी किस करायचे थांबत नव्हते. अखेर फोटोग्राफरला फोटोशूट निघून जाण्याची वेळ आली.   

वाचा: भारतीय क्रिकेटपटूच्या विरोधात पत्नीची तक्रार, दारूच्या नशेत कुकिंग पॅनने मारहाण 

 

नवरा नवरी आणि फोटोग्राफरचा हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही तासातचं व्हिडिओला 3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचप्रमाणे 800 हून अधिक वेळा व्हिडिओ रिट्विट झाला आहे.