दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही जर पात्रताधारक आहात आणि सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहात तर यासाठी अर्ज दाखल करू शकता

Updated: Jun 27, 2019, 02:43 PM IST
दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी title=

मुंबई : तुम्ही दहावी पास आहात आणि तुमच्या आयटीआय सर्टीफिकेट आहे तर तुम्हीही सरकारी नोकरी मिळवू शकता. 'बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन' अर्थात बीआरओमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. सुरक्षा मंत्रालया अंतर्गत येणारी बीआरओ ही संस्था सीमारेषेजवळ पायाभूत सुविधा उभारण्याचं काम करते. याच बीआरओमध्ये ७७८ जागा निर्माण झाल्यात. आपल्या अधिकृत वेबसाईट http://www.bro.gov.in/ वर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळू शकते. 

मल्टि स्किल्ड वर्कर, चालक, ऑपरेटर आणि इतर पदांसाठी ही भरती होणार आहे. तुम्ही जर पात्रताधारक आहात आणि सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहात तर यासाठी अर्ज दाखल करू शकता.

एकूण जागा - ७७८

ड्रायव्हर  - ३८८ जागा

इलेक्ट्रिशियन - १०१ जागा

वाहन मॅकेनिक - ९२ जागा

मल्टि स्किल्ड वर्कर - १९७ जागा

महत्त्वाच्या तारखा

या जागांसाठी १ जून २०१९ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आलीय. तुम्ही १५ जुलै २०१९ पर्यंत अर्ज दाखल करू शकता. मात्र, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोपाम, मनिपूर, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, जम्मू-काश्मीरमधील लडाख विभाग, लाहौल आणि स्पीती व्हॅली, चंबामधील पांगी विभाग, अंदमान निकोबार, लक्षद्वीपसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे ३० जुलै २०१९. 

पात्रता

- दहावी पास असणं गरजेचं

- आयटीआय सर्टीफिकेट

- चालक परवाना

वयोमर्यादा

१८ ते २७ वर्षांचे उमेदवार यासाठी अर्ज दाखल करू शकतील.

नोकरी संधीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा