निवडणुकीच्या वेळी पिवळी साडीतील महिला आठवते का? त्यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

 पिवळी साडीवाली महिलेची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ती या व्हिडिओमुळे.

Updated: Jun 27, 2019, 02:44 PM IST
निवडणुकीच्या वेळी पिवळी साडीतील महिला आठवते का? त्यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल title=

मुंबई : लोकसभेची निवडणूक झाली. मात्र, या निवडणुकीत सोशल मीडियावर एक पीडब्ल्यूडीची एक महिला अधिकारी रिना द्विवेदी झळकली आणि तिला खूप प्रसिद्धी मिळाली. पिवळी साडीवाली म्हणून खूप चर्चा झाली. पुन्हा एका रिना द्विवेदींची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे ही चर्चा सुरु झाली आहे.

रिना यांनी आपला एक व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये रिना या एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळत आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

 lady Returning Officer in yellow saree photos and videos viral on facebook and twitter

लोकसभा निवडणुकीच्यावेळी रिना द्विवेदी या उत्तर प्रदेशात लखनऊ येथे एका मतदान केंद्रात निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी मतदान केंद्रावर जाताना पिवळी साडी परिधान केली होती. त्यांचा या साडीतील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यांना पिवळ्या साडीतील बाई म्हणून ओळख मिळाली. त्या मॉडेल प्रमाणे वाटत होत्या. त्यांचे फोटो सोशल मीडावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची खूप चर्चा सुरु झाली. आता त्यांनी एक काही सेकंदाचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.