'आई मृत वडिलांचा अपमान करतेय', प्रेमसंबंध असल्याने मुलांचा संताप; प्रियकराची आतडी बाहेर काढली अन्....; पोलिसांच्याही अंगावर काटा

गुजरातमध्ये दोन भावांनी मिळून आईच्या प्रियकराची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचे आतडे बाहेर काढले आणि हवेत उडवले. ही क्रूरता ऐकल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 29, 2025, 06:52 PM IST
'आई मृत वडिलांचा अपमान करतेय', प्रेमसंबंध असल्याने मुलांचा संताप; प्रियकराची आतडी बाहेर काढली अन्....; पोलिसांच्याही अंगावर काटा title=

गुजरातमध्ये दोन भावांनी मिळून आईच्या प्रियकराची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. आरोपी फक्त हत्या करुन थांबले नाहीत. हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचे आतडे बाहेर काढले आणि हवेत उडवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांचा 53 वर्षीय रतनजी ठाकोर याच्यावर राग होता. आपल्या आईसह त्याचे संबंध असल्याने दिवंगत वडिलांचा अपमान होत असल्याची त्यांची भावना होता. 

ही घटना 26 जानेवारी रोजी गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यात घडली आहे. पीडित व्यवसायाने गवंडी होता. तो त्याच्या सहकारी कामगारांसह घर बांधत असताना हत्या करण्यात आली. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी 27 वर्षीय संजय ठाकोर आणि 23 वर्षीय जयेश ठाकोर दिवसाढवळ्या लोखंडी रॉड घेऊन पोहोचले आणि रतनजी याच्यावर हल्ला केला. यानंतर त्यांनी त्याच्या पोटावर एकापेक्षा जास्त वेळा धारदार शस्त्राने वार केले. इतक्या निर्घृणपणे त्यांनी वार केले की त्याची आतडी बाहेर आली. धक्कादायक म्हणजे यानंतरही ते थांबले नाहीत. त्यांनी आतडी उचलली आणि हवेत उडवून कापून टाकली. 

यादरम्यान अनेक लोक हा धक्कादायक घटनाक्रम पाहत होते. त्यांनी हे सर्व अंगावर काटा आणणारं होतं असं सांगितलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, "काही कामगारांनी रतनजी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही".

पीडिताचे मागील अनेक वर्षांपासून आरोपींच्या आईसह प्रेमसंबंध होते. दोन्ही आरोपींचा या नात्याला विरोध होता. हे कुटुंबासाठी फारच लज्जास्पद असल्याचं त्यांचं म्हणणं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

पीडिताचा मुलगा अजय याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने पोलिसांना सांगितलं आहे की, दोन्ही भावांनी वडिलांनी आईपासून दूर राहा अशी धमकी दिली होती. त्यांनी अनेकदा यावरुन भांडणही केलं होतं. याप्रकरणी पंचायतही बोलावण्यात आली होती, पण काही तोडगा निघाला नव्हता. 

दोन्ही आरोपी हत्येनंतर बाईकवरुन फरार झाले होते. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे काही तासातच त्यांचा माग काढला आणि अटक केली. हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्रही जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x