अर्थसंकल्प २०१८ : 'हवाई चप्पल घालणारेही हवाई प्रवास करतील'

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना एव्हिएशन सेक्टरलाही दिलासा दिलाय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 1, 2018, 01:40 PM IST
अर्थसंकल्प २०१८ : 'हवाई चप्पल घालणारेही हवाई प्रवास करतील' title=

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना एव्हिएशन सेक्टरलाही दिलासा दिलाय. 

देशभरात विमानतळांची संख्या पाच टक्क्यांनी वाढवण्यात येणार असल्याचं सांगतानाच 'लवकरच हवाई चप्पल घालणारेही हवाई प्रवास करु शकतील' असंही जेटलींनी आपल्या भाषणात म्हटलं

यासोबतच उडाण (UDAN) योजनेंतर्गत ५६ नव्या विमानतळांचं कामही सुरू होणार असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. 

अधिक वाचा : जेटलींनी महिलांना दिली खुशखबर

महत्त्वाचं... 

- विमानतळांची संख्या पाच टक्यांनी वाढविणार 

- वापरात नसणारी ५६ एअरपोर्ट व ३१ हेलिपॅड्स उडान योजनेशी जोडणार

- सध्या १२४ विमानतळे सेवेत

- कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी उडान योजनेला बळ देणार

- ९०० नवीन विमान खरेदी करणार 

काय आहे 'उडान' योजना

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्षेत्रीय विमान सेवा योजना 'उडान'ला हिरवा झेंडा दाखवला होता

- क्षेत्रीय संपर्क वाढवण्यासाठी सरकारनं सुरु केलेली बाजार आधारित पहिली योजना

अधिक वाचा : संपूर्ण अर्थसंकल्प २०१८ : अरुण जेटलींनी केल्या मोठ्या घोषणा

- या योजनेंतर्गत पहिल्या फेजमध्ये शिमला-दिल्ली, कडप्पा-हैदराबाद आणि नांदेड-हैदराबाद या मार्गावर सेवा सुरु करण्यात आलीय

- या योजनेंतर्गत जवळपास ५०० किलोमीटर अंतरासाठी १ तासांची फ्लाईट किंवा ३० मिनिटांच्या हेलिकॉफ्टर प्रवासासाठी २,५०० रुपये आकारण्यात येतील

अधिक वाचा : इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, नोकरदारांची घोर निराशा