नवी दिल्ली : अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मोदी सरकार कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यातून त्यांनी शेतकरी, गरीब आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच शिक्षणासाठीही त्यानी काही घोषणा केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे...
- शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी येत्या चार वर्षांत १ लाख कोटी रुपये खर्च करण्यात
- आदिवासी विभागांमध्ये नवोद्यसारखे एकलव्य स्कूल काढणार
- आदिवासी शिक्षणासाठी १ लाख कोटी खर्च करणार
- बारावीपर्यंत सर्वांना शिक्षण मिळण्याचे उद्दिष्ट
- डिजिटल शिक्षणाला चालना देणार
- आदिवासी शिक्षणासाठी १ लाख कोटी खर्च करणार
- १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम
- प्री-नर्सरी आणि बारावी पर्यंतचं शिक्षण धोरण एकच राहणार यावर भर
- देशात २४ नवीन मेडिकल कॉलेज उघडणार
- फ्लॅगशिप राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना सुरू होणार
- आरोग्य योजनांसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना
- १० कोटी गरीब कुटुंबियांसाठी ५ लाख रूपये दरवर्षीची हॉस्पिटलायझेशनची सुविधा
- टीबी रुग्णासाठी सरकारकडून प्रत्येक महिन्यात ५०० रूपये
- यावर्षी ७० लाख नोक-या निर्माण करण्याचे लक्ष्य
- ५० लाख युवकांना नोकरीसाठी ट्रेनिंग देणार सरकार
- रोजगारात महिलांची भागीदारी वाढवण्यावर जोर
- व्यापार सुरू करण्यासाठी सरकार ३ लाख कोटींचा फंड
- मुद्रा योजनेतून ३ लाख कोटी रूपयांचं कर्ज देण्याचं लक्ष्य