४५ लाखांपर्यंतच्या घरखरेदीवर ७ लाखांचा होणार फायदा, मध्यमवर्गीयांना दिलासा

लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा प्रस्ताव मांडला

Updated: Jul 5, 2019, 06:13 PM IST
४५ लाखांपर्यंतच्या घरखरेदीवर ७ लाखांचा होणार फायदा, मध्यमवर्गीयांना दिलासा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं पूर्णकालीन अर्थसंकल्प (Budget 2019) मांडत मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. सर्वांसाठी निवासस्थान आणि स्वस्त घरांचं मोदी सरकारचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना, ४५ लाखांपर्यंत किंमतीचं घर खरेदी करणाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. ४५ लाखांपर्यंतचं घर खरेदी करणाऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय सीतारमण यांनी जाहीर केलाय. 

लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा प्रस्ताव मांडला. '४५ लाख रुपये किंमतीपर्यंतचं मूल्य असणारं स्वस्त घर खरेदी करणाऱ्यांसाठी ३१ मार्च २०२० पर्यंत घेतल्या गेलेल्या कर्जावर लागणाऱ्या व्याजावर १.५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देण्याचा प्रस्ताव मांडते' असं त्यांनी यावेळी म्हटलं. 

त्यांच्या या प्रस्तावामुळे स्वस्त घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींना आता व्याजाच्या रक्कमेवर ३.५ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकेल. 

यामुळे मध्यमवर्गीय घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला १५ वर्षांच्या कालावधीसाठी घेतल्या गेलेल्या कर्जावर जवळपास ७ लाख रुपयांचा लाभ मिळू शकेल.