बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीये. मुख्य आरोपी हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची माहिती असून पोलीस त्याचा शोध घेतायत.  

ANI | Updated: Dec 5, 2018, 12:05 AM IST
 बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक  title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीये. मुख्य आरोपी हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची माहिती असून पोलीस त्याचा शोध घेतायत. बुलंदशहरच्या सियाना भागात एका गायीचा मृतदेह आढळल्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये एका पोलीस निरीक्षकासह दोघांचा बळी गेलाय. 

या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटीची स्थापना केली असून पुढील तपास या टीमकडे सोपवण्यात आलाय. दुसरीकडे दंगलप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानंही दखल घेतली असून राज्य सरकार तसंच पोलीस महासंचालकांना नोटीस पाठवलीये. 

दरम्यान, या दंगलीमध्ये शहीद झालेले पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह आणि मृत्युमुखी पडलेला तरुण सुमित कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरूवातीला सुमितच्या नातलगांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. 

जिल्हा प्रशासनानं नातलगांनी ५ लाखांची मदत जाहीर केल्यानंतर सुमितच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दंगलीच्या एफ.आय.आरमध्ये सुमितचंही नाव आहे. त्यामुळे नातलगांमध्ये संतापाची भावना आहे. पोलिसांनी हे नाव हटवण्याचीही तयारी दाखवलीये.