Mukesh Ambani, Gautam Adani : दर दिवशी घडणाऱ्या घडामोडींचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम जागतिक अर्थसत्तेवर होत असून, त्याचा फटका आता आशिया खंडातील आणि जगभरातील श्रीमंतांच्या यादीत नाव असणाऱ्या अदानी- अंबानींवरही होत असल्याचं चित्र आहे.
इराण आणि इस्रायलमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळं जगभरातील शेअर बाजार गडगडले. ज्यामुळं जगातील श्रीमंतांच्या यादीतही बदल झाले. Top 20 यादीत पहिल्या तीन क्रमांकांवर असणाऱ्या धनिकांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये बरेच बदल झाले. यामध्ये फेसबुकची पेरेंट कंपनी असणाऱ्या मेटाचे सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग, एनविडियाचे सीईओ जेंसन हुआंग आणि डेल कॉर्पोरेशनचे मायकल डेल यांचाही समावेश आहे.
जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी असणाऱ्या झकरबर्गचाही इथं पायउतार झाला असून, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांसारख्या धनिकांनाही याचा धक्का बसला. गुरुवारी झुकरबर्गच्या वार्षिक उत्पन्नात 3.43 अब्ज डॉलरची वाढ झाली आणि तो या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला.
जगभरातील श्रीमंतांच्या या यादीत मुकेश अंबानी 14 व्या स्थानी घसरले. अधिकृत आकडेवारीनुसार गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एकूण उत्पन्नामध्ये 4.29 अब्ज डॉलरनं घट होऊन एकूण उत्पन्न 107 डॉलरवर पोहोचलं. तर, यंदाच्या वर्षी आतापर्यंत रिलायन्सची एकूण मिळकत 10.5 अब्ज डॉलरनं घटली. गौतम अदानी यांच्याही एकूण संपत्तीमध्ये 2.93 अब्ज डॉलरची घट नोंदवली असून, ते या यादीत थेट 17 व्या स्थानावर पोहोचले आहेत. ज्यामुळं जगभरातील घडामोडींनी अंबानी- अदानींच्या श्रीमंतीलाही सुरुंग लावल्याचं स्पष्ट होत आहे.
मागील बऱ्याच काळापासून जगावर आलेलं आर्थिक संकट अनेक क्षेत्रांवर परिणाम करताना दिसत आहे. व्यवसाय क्षेत्रातील मुरब्बी मंडळीसुद्धा या आव्हानांचा सामना करत असल्याचंच यामुळं स्पष्ट होत आहे.
दरम्यान, श्रीमंतांच्या या यादीत एलॉन मस्क 256 अब्ज डॉलर इतक्या वार्षिक उत्पन्नासह अग्रस्थानी असून, 205 अब्ज डॉलरसह जेफ बेोस तिसऱ्या स्थानी आहे. तर, फ्रेंच व्यावसायिक बर्नार्ड आरनॉल्ट 193 अब्ज डॉलरच्या उत्पन्नासह यादीत चौथ्या स्थानी आहेत.