मुकेश अंबानी यांची अंडरगार्मेंट्स व्यवसायात एन्ट्री, Jockey-Levi’s ब्रँडला टक्कर... हा ब्रँड करणार लाँच

RIL-Delta Galil JV : एशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आता अंडरगार्मेंट व्यवसायत एन्ट्री करणार आहेत. अंबानी यांच्या रिलायन्स समुहाने इजरायलच्या मोठ्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. यामुळे रिलायन्स आता Jockey-Levi’s सारख्या मल्टीनॅशनल ब्रँडला टक्कर देणार आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 10, 2024, 04:56 PM IST
मुकेश अंबानी यांची अंडरगार्मेंट्स व्यवसायात एन्ट्री, Jockey-Levi’s ब्रँडला टक्कर... हा ब्रँड करणार लाँच title=

RIL-Delta Galil JV : लहान मुलांची खेळणी, कपडे आणि चॉकलेटनंतर आता एशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी अंडरगार्मेंट व्यवसायात एन्ट्री करणार आहेत. रिलायन्स रिटेलने (Relilance Retail) गेल्या काही वर्षांत अनेक देशांतर्गत इनरवेअर किरकोळ विक्रेते आणि ब्रँड्स विकत घेत आपली बाजारपेठ वाढवली. आता मुकेश अंबानी यांची नजर जागतिक बाजारपेठेवर (Global Market) आहे. यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलनेइस्रायलच्या बड्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्री Jockey-Levi’s, स्पीडो सारख्या मल्टीनॅशनल ब्रँडला टक्कर देणार आहे.

बड्या ब्रँडशी हातमिळवणी

अंडरगार्मेंट व्यवसायासाठी रिलायन्स समुहाने इस्रायलच्या डेल्टा गॅलिल नावाच्या कंपनीशी करार केला आहे. डेल्टा गॅलिल ही जगातील इनरवेअर प्रोडक्ट बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आता रिलायन्स या इस्रायली कंपनीच्या मदतीने केवळ इनरवेअर डिझाइन करणार नाही, तर त्यांचा जागतिक ब्रँडही विकणार आहे. डेल्टा गॅलीलने सध्या जागतिक स्तरावर कॅल्विन क्लेन, टॉमी हिलफिगर अशा अनेक बहुराष्ट्रीय ब्रँडबरोबर करार केला आहे. याशिवाय नुकतंच डेल्टा गॅलीलने अॅडिडास आणि पोलो राल्फ लॉरेन या बड्या ब्रँडशीही करार केला आहे.

असा आहे रिलायन्सचा प्लान?

इकोनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार रिलायन्स इंडस्ट्री आणि डेल्टा गॅलील यांची बरोबरीची हिस्सेदारी असणार आहे. याशिवाय डेल्टा स्वत:चे ब्रँड 7 For All Mankind आणि Necessities भारतात आणण्याच्या तयारीत आहे. डेल्टा गॅलीलचे जगातील तीन प्रमुख देशांमध्ये आरएंडडी सेंटर आहेत. यात इस्त्रायलमध्ये फॅब्रिक, ओरेगममध्ये सॉक्स आणि चीनमध्ये महिलांचे इनरवेअर यांचा समावेश आहे. डेल्टा गॅलील कंपनीकडे सात रजिस्टर पेटेंट, 12 पेंडिंग पेटेंट आणि 8 एक्टिव्ह टेक ट्रेडमार्क आहेत.

जगभरात रिलायन्सचा विस्तार

रिलायन्स रिटेलने गेल्या काही वर्षात देशांतर्गत इनरवेअर किरकोळ विक्रेते आणि ब्रँड्स विकत घेत आपली बाजारपेठ वाढवली आहे. भारतातील इनरवेअर सेगमेंटने 2013 ते 2023 या कालावधीत 61 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तज्ज्ञांच्या मते, 2025 मध्ये ही वाढ 75466 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये महिलांच्या इनरवेअर आणि इतर पोशाखांचा सध्याचा बाजार हिस्सा 60 टक्के आहे. तर पुरुषांच्या कपड्यांचा वाटा 30 टक्के आहे आणि उर्वरित भाग मुलांच्या कपड्यांसाठी आहे. महिलांसाठी आरामदायी आणि स्टायलिश इनरवेअर करण्यावर डेल्ट गॅलिल आणि रिलायन्सचा भर असणार आहे.