फिजीचं पाणी, व्हिएतनामचे काजू, मेक्सिकोचे टोमॅटो...मग भारतातून अमेरिका कोणती गोष्ट आयात करते?

Business News : अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. केवळ 33.5 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. जगातील जवळपास प्रत्येक देशाबरोबर अमेरिकेचे व्यावासायिक संबंध आहेत. 

राजीव कासले | Updated: Sep 6, 2024, 10:29 PM IST
फिजीचं पाणी, व्हिएतनामचे काजू, मेक्सिकोचे टोमॅटो...मग भारतातून अमेरिका कोणती गोष्ट आयात करते? title=

Business News : अमेरिका (America) हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. केवळ 33.5 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. जगातील जवळपास प्रत्येक देशाबरोबर अमेरिकेचे व्यावासायिक संबंध आहेत. मोठी बाजारपेठ असल्याने जगातील प्रत्येक देशाचा अमेरिकेशी व्यापार वाढवण्याचा प्रयत्न असतो. पण तुम्हाला माहित आह का? जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Economy) असतानाही अमेरिकेत अनेक गोष्टी आयात केल्या जातात. इतकंच काय पिण्याचं पाणी देखील अमेरिका वेगळ्या देशातून मागवतं. पिण्याच्या पाण्याशिवाय अनेक खाद्यपदार्थ अमेरिकेत बाहेरच्या देशात आणले जातात.

 

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सचा अहवाल

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार अमेरिका आपल्या शेजारचा देश कॅनाडाहून मशरुम,  मांस, मासे, लॉबस्टर, खेकडे, कॅनोला तेल, गहू, कॉर्न, ओट्स, बार्ली आणि मॅपल सिरप आयात करते. तर टोमॅटो, एवोकॅडो, शिमला मिरची, क्रॅनबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, काकडी, ब्रोकोली, टरबूज, आंबा, शतावरी, लिंबू, कांदे, पालक,  अक्रोड आणि साखर मेक्सिकोमधून सर्वाधिक आयात केली जाते. अमेरिकेत मेंढ्याचं मांस ऑस्ट्रेलियातून येतं तर संत्र्याचा रस मोठ्याप्रमाणावर ब्राझीलमधून आयात केला जातो.  सफरचंदाचा रस आणि गोठलेले मासे चीनमधून येतात. द्राक्षं आणि पोल्ट्री चिलीमधून आयात केली जाते तर कच्ची कॉफी कोलंबियामधून येते.

 

भारतातून अमेरिकेत कोणती गोष्ट आयात होते?

कोस्टारिकामधून अमेरिकेत अननसची मोठ्या प्रमाणावर आयात होते. तर आयव्हरी कोस्टमधून कॉफी बिन्स येतात. ग्वाटेमालामधून केळी आणि टरबूज, इंडोनेशियाचे पाम तेल आणि कोकोआ बटर तर लोणी आयर्लंडमधून मागवलं जातं. ऑलिव्ह तेल, तळलेले स्वाइनचे मांस आणि इटलीचे चीज. न्यूझीलंडमधून सर्वाधिक दूध अमेरिकेला पुरवलं जातं. अमेरिका नेदरलँड्समधून कोको पावडर, स्पेनमधून रिफाइंड ऑलिव्ह ऑईल आणि स्वित्झर्लंडमधून भाजलेली कॉफी आयात करते. याशिवाय अमेरिका थायलंडमधून तांदूळ आयात करते. व्हिएतनाम हा अमेरिकेला काळी मिरी आणि काजूचा सर्वात मोठा पुरवठादार आहे.
 

आता प्रश्न असा उपस्थित होतो की, अमेरिका भारतातून कोणते खाद्यपदार्थ आयात करते?  भारत हा अमेरिकेचा कोळंबीचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. आकडेवारीनुसार, भारताने 2023-24 मध्ये अमेरिकेला 2,97,571 मेट्रिक टन गोठवलेल्या कोळंबीचा पुरवठा केला. या काळात भारताची सीफूड निर्यात सर्वोत्तम पातळीवर पोहोचली होती. 2023-24 मध्ये भारताने एकूण 17,81,602 मेट्रिक टन सीफूडची निर्यात केली होती, ज्याचे एकूण मूल्य 60,523.89 कोटी रुपये इतकं होतं. अमेरिकेनंतर चीन, युरोपियन युनियन, जपान, मध्य पूर्व, दक्षिणपूर्व आशिया ही भारतीय सीफूडची मोठी बाजारपेठ आहे.