Captain Shiva Chauhan : भारतातील सर्वात डेंजर युद्धभूमी; सियाचिनमध्ये पहिल्या महिला लष्करी अधिका-याचे पोस्टिंग

 सियाचिन ही भारतातील सर्वात डेंजर युद्धभूमी समजली जाते.  सियाचीनसारख्या उंच युद्धभूमीवर पहिल्यांदाच एका महिला लष्करी अधिका-याची पोस्टिंग झाली आहे.  कॅप्टन शिवा चौहान(Captain Shiva Chauhan) यांची सियाचिनमध्ये पोस्टिंग झाली आहे.

Updated: Jan 3, 2023, 08:48 PM IST
Captain Shiva Chauhan : भारतातील सर्वात डेंजर युद्धभूमी; सियाचिनमध्ये पहिल्या महिला लष्करी अधिका-याचे पोस्टिंग  title=

Captain Shiva Chauhan 1st Woman Army Officer At Siachen Glacier: प्रत्येक  भारतीयांना अभिमान वाटेल अशी घडामोड सैन दलात घडली आहे. सियाचिन ही भारतातील सर्वात डेंजर युद्धभूमी समजली जाते.  सियाचीनसारख्या उंच युद्धभूमीवर पहिल्यांदाच एका महिला लष्करी अधिका-याची पोस्टिंग झाली आहे.  कॅप्टन शिवा चौहान(Captain Shiva Chauhan) यांची सियाचिनमध्ये पोस्टिंग झाली आहे.

अत्यंत कठोर प्रशिक्षण पार केल्यानंतर कॅप्टन शिवा चौहान यांची सियाचिन ग्लेशिअरवर पोस्टिंग झाली आहे. सियाचिनसारख्या सर्वात उंच आणि खडतर युद्धभूमीवर तैनात होणा-या कॅप्टन शिवा चौहान पहिल्या महिला भारतीय अधिकारी ठरल्या आहेत. ब्रेकिंग द ग्लास सीलिंग असं म्हणत ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत  शिवा चौहान यांच्या पोस्टींगची माहिती देण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरु ही माहिती शेअर करण्यात आली आहे. 

सियाचीन ग्लेशियर हे पृथ्वीवरील सर्वात उंच युद्धभूमी आहे,  जिथे भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1984 पासून युद्ध होत आहे.सियाचीनमधील कुमार पोस्टवर तैनात होण्याआधी शिवा चौहान यांना कठोर प्रशिक्षण घ्यावं लागलं होतं. कुमार पोस्टमध्ये कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या असून त्यांनी वेगळा विक्रक रचला आहे. 

सियाचीनमध्ये हाड गोठवणारी थंडी

सियाचीनमध्ये हाड गोठवणारी थंडी असते. येथील तापमान मायनस 21 अंश सेल्सियसपर्यंत असते. शून्य म्हणजे शून्य दृष्यमान.  या काळात हात डोळ्यांसमोर ठेवले तरी समोरचे काहीच दिसत नाही. अशा परिस्थितीत, सैनिक एकमेकांना दोरीने बांधून ठेवत खडा पहारा देतात. आंघोळीसाठी पाणी वितळण्यासाठी सैनिकांना 3 तास लागतात. भारत ग्लेशियरच्या संरक्षणासाठी दररोज 5 ते 7 कोटी रुपये खर्च करतो. ग्लेशियरमध्ये सुमारे 3000 सैनिक नेहमीच कार्यरत असतात. हिमनदीचे रक्षण करण्याची जबाबदारी मिळालेला प्रत्येक सैनिक सुमारे तीन महिने सेवा देतो. यापेक्षा जास्त काळ कुणही कठोर हवामानात जिवंत राहू शकत नाही. येथील सैनिकांना हेलीकॉप्टरद्वारे आवश्यक वस्तुंचा पुरवठा केला जातो.