Team India Playing XI vs Bangladesh 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून तब्बल 280 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने यासह सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी मिळवली. आता कानपुर येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया बांगलादेशला हरवून क्लीन स्वीप देण्याचा करण्याचा प्रयत्न करेल. शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश पहिला टेस्ट सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पार पडला. तर दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होईल. 27 सप्टेंबर पासून दुसऱ्या टेस्टला सुरुवात जाणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केलाय. पहिल्या सामन्यात निवडलेल्या टीम इंडियाने उत्तम परफॉर्मन्स केल्याने बीसीसीआयने टीममध्ये कोणतेही बदल न करता हीच टीम कानपुर टेस्ट सामन्यासाठी सुद्धा जाहीर केलीये.
कानपुर येथील दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सोबत ओपनिंगसाठी उतरेल. तर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल बॅटिंगसाठी उतरू शकतो. 4 नंबरवर विराट कोहली तर 5 नंबरवर विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला संधी मिळू शकते. रोहित 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी केएल राहुलला संधी मिळू शकते. 7 व्या क्रमांकावर ऑल राउंडर रवींद्र जडेजा तर 8 व्या क्रमांकावर अनुभवी स्पिनर गोलंदाज आर अश्विन याला संधी मिळू शकते. कानपूरमध्ये रोहित टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये तीन स्पिनर गोलंदाजांना संधी देऊ शकतो त्यामुळे वेगवान गोलंदाज आकाशदीप याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तर वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळू शकते.
हेही वाचा : भारत - बांगलादेश दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह और मोहम्मद सिराज.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि शेवटचा टेस्ट सामना हा शुक्रवार 27 सप्टेंबर पासून सुरु होईल. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स 18 चॅनेलवर दाखवण्यात येईल. तर डिजिटल यूजर्स जिओ सिनेमा अँप आणि वेबसाईटवर सुद्धा याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. भारत - बांगलादेश दुसरा टेस्ट सामना हा डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर फ्रीमध्ये लाईव्ह पाहता येईल. जे डीडी स्पोर्ट्स चॅनेल केबल टीव्ही किंवा डीटीएच प्लॅटफॉर्म जसे की डिशटीव्ही, एअरटेल डिजिटल टीव्ही आणि टाटा प्लेवर प्रसारित होईल तेथे भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार नाही.