Bollywood Actor Struggle Story: बॉलिवुडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात मिळेल ते काम केले आहे. ते कलाकार आज सुपरस्टार बनले आहेत. चित्रपटसृष्टीत आपले करिअर सुरू करण्यासाठी त्यांना पडद्यामागे काम करावे लागले. करण जौहर, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सुरूवातीला असिस्टेंट डायरेक्टरचे काम केले, तर शाहिद कपूर आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांनी बॅकग्राउंड डांसर म्हणून काम केले आहे. यात अजून एका कलाकाराचा समावेश आहे. त्यानेही आपल्या करिअरच्या सुरूवातीला प्रसिद्ध अभितेने जितेंद्र यांच्या चित्रपटात बॅकग्राउंड डांसर म्हणून काम केले होते. त्याने बॉलीवुडला अनेक हिट चित्रपट दिले. पण फोटोतला हा अभिनेता नक्की कोण आहे ओळखू येतोय का?
'सर्किट' नाव घेतल्यावर तुम्हाला लगेच कळाले असेल की, हा अभिनेता दुसरा कोणी नाही तर 'अरशद वारसी' आहे. अरशद वारसीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात काळे कपडे घातलेला अरशद वारसी बॅकग्राउंड डांसर म्हणून डान्स करताना दिसत आहे. त्या फोटोत अरशदच्या समोर आभिनेता जितेंद्र उभा आहे. हा फोटो 1989 मध्ये आलेल्या 'आग से खेलेंगे' या चित्रपटातील आहे. ज्याचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते.
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अरशद वारसीवला खूप संघर्ष करावा लागला आहे. अरशद लहान असताना त्याने आपले आई-वडील गमावले. चित्रपटात काम करण्यापूर्वी तो छोटी-मोठी नोकरी करत होता. गरिबीमुळे त्याला शिकता आले नाही. आपल्या संघर्षाच्या काळात अशरदने चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला त्याला छोटी-छोटी कामे मिळायची पुढे हळूहळू तो चित्रपटांच्या गाण्यांमध्ये बॅकग्राउंड डांसर म्हणून काम करू लागला.
1996 मध्ये तेरे मेरे सपने या चित्रपटातून अरशद वारसीने कलाकार म्हणून पदार्पण केले. पण हा चित्रपट फ्लॉप झाला, त्यामुळे अरशद खूप निराश झाला होता. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याला 3 वर्षे चित्रपटात कोणतेच काम मिळाले नव्हते. मग अरशदने चित्रपटात अभिनेता म्हणून छोट्या-मोठ्या भूमिका करायला सुरूवात केली. पण अरशदच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपट. त्यानंतर त्याचे आयुष्य बदलले आणि त्याला अनेक चांगले चित्रपट मिळू लागले. त्यानंतर 'धमाल' आणि 'गोलमाल' सारख्या कॉमेडी चित्रपटांनी अरशदला बॉलिवूडचा स्टार बनवले.