तुमच्याकडे जुनी कार आहे? तर खर्च करण्यासाठी तयार रहा, जाणून घ्या Scrappage Policy मधील बदल.

जुन्या गाड्यांना रोडवरुन हटवण्यासाठी सरकारने 2021-22 च्या बजेटमध्ये व्हेईकल स्क्रॅप्रिंग पॉलिसी घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. 

Updated: Mar 17, 2021, 07:23 PM IST
तुमच्याकडे जुनी कार आहे? तर खर्च करण्यासाठी तयार रहा, जाणून घ्या Scrappage Policy मधील बदल. title=

मुंबई : जर तुमच्याकडे नवीन कार आहे तर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) ची Validity चेक करा. कारण, आता 1 ऑक्टोंबरपासून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रीन्यूअल (Vehicle Registraton fees) तुम्हाला महागात पडेल. जुन्या गाड्यांना रोडवरुन हटवण्यासाठी सरकारने 2021-22 च्या बजेटमध्ये व्हेईकल स्क्रॅप्रिंग पॉलिसी घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये 20 वर्ष जुन्या Private गाड्या आणि 15 वर्ष जुन्या कमर्शियल गाडयांचे फिटनेस टेस्ट करणे गरजेचे आहे.

त्यात असे ही नमूद केले आहे की, जर वाहन रजिस्ट्रेशन स्क्रॅप करण्यासाठी सर्टिफिकेट घेतले गेले असेल तर, अशा परिस्थितीत नवीन वाहन खरेदी करण्यासाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट Fees घेतली जाणार नाही.

1 ऑक्टोबरपूर्वी जर तुम्ही स्क्रॅप प्रमाणपत्र घेतले नसेल तर, जुन्या कारवर तुम्हाला इंसेंटिव मिळणार नाही. तसेच आरसीचे (RC) नूतनीकरण आणि फिटनेस प्रमाणपत्र घेणेही महाग पडेल. हे सर्व खासगी वाहने आणि व्यावसायिक वाहनांना लागू असेल.

काय असणार फी?

मोटरसायकल
नवीन नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी 300 रुपये लागतील, तर नूतनीकरणासाठी 1000 रुपये द्यावे लागतील.

थ्री व्हीलर / Quadricycle
नवीन नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी 600 रुपये द्यावे लागतील, तर नूतनीकरणासाठी 2500 रुपये द्यावे लागतील.

हलकी मोटर वाहन (Light motor vehicle)
नवीन नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी 600 रुपये लागतील, तर नूतनीकरणासाठी 5000 रुपये द्यावे लागतील.

इंपोर्टेड गाड़ी (Imported motor vehicle)
नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 2500 रुपये लागतील, तर नूतनीकरणासाठी 10,000 रुपये द्यावे लागतील.

मग तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतील...

जर नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड प्रकार असेल तर, ते जारी करण्यासाठी किंवा नुतनीकरणासाठी आपल्याला 200 रुपये अधिक द्यावे लागतील. याशिवाय नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यास उशीर झाल्यास मोटारसायकलसाठी दरमहा 300 रुपये द्यावे लागतील, उर्वरित गाड्यांसाठी 500 रुपये जास्तीचे शुल्क आकारले जाईल.

फिटनेस सर्टिफिकेट ची टेस्टिंग महाग

15 वर्ष जुन्या वाहनांच्या नूतनीकरणासाठी आणि फिटनेस सर्टिफिकेटच्या रीन्यूअलसाठी टेस्ट शुल्कही महाग करण्यात आला आहे.

1. मॅन्युअल मोटारसायकलसाठी 400 रुपये द्यावे लागतील, तर स्वयंचलित गाडीसाठी 500 रुपये शुल्क आकारले जाईल.
2. मॅन्युअल हलकी वाहने, तीन चाकी वाहनांसाठी 800 रुपये आहे. तर स्वयंचलित वाहनांसाठी 1000 रुपये निश्चित केले गेले आहेत.
3. मध्यम वाहन / पॅसेंजर मोटर वाहन - मॅन्युअलसाठी 800 रुपये आणि स्वयंचलितसाठी 1300 रुपये निश्चित केले आहेत.
4. अवजड वाहन / पॅसेंजर मोटार वाहन - मॅन्युअलसाठी 1000 रुपये आणि स्वयंचलितसाठी 1500 रुपये शुल्क आकारले आहेत.

फिटनेस सर्टिफिकेट रीन्यूअल सुद्धा महाग

15 वर्षापेक्षा जुन्या वाहनांच्या नूतनीकरणासाठी आणि फिटनेस प्रमाणपत्रासाठी किती शुल्क आकारले जाईल?

1. मोटारसायकलसाठी 1000 रुपये.
2. तीन चाकी किंवा quadricycle साठी 3500 रुपये.
3. हलक्या वाहनांसाठी 7500 रुपये.
4. मध्यम वस्तू / प्रवासी मोटर वाहनासाठी 10 हजार रुपये.
5. भारी वस्तू / प्रवासी मोटार वाहनासाठी 12 हजार 500 रुपये.

मुदत संपल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र घेतल्यास, 50 रुपये दर दिवशी प्रमाने अधिक शुल्क आकारले जाईल.