Zomato Delivery प्रकरणात, डिलीव्हरी बॉयला मोठा दिलासा

झोमॅटो (Zomato) च्या डिलीव्हरी बॅायने हल्ला केल्याचा आरोप केलेल्या मॉडलला, तो आरोप आता भारी पडला आहे.

Updated: Mar 17, 2021, 07:12 PM IST
Zomato Delivery प्रकरणात, डिलीव्हरी बॉयला मोठा दिलासा title=

मुंबई : झोमॅटो (Zomato) च्या डिलीव्हरी बॅायने हल्ला केल्याचा आरोप केलेल्या मॉडलला, तो आरोप आता भारी पडला आहे. तिच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहेत. zomato delivery boy कामराजकडून तक्रार नोंदवून घेतल्यानंतर ही कारवाई केली आहे. एवढेच नाही तर हितेशा ने तिचा ट्विटर वरील तो व्हिडिओ सुद्धा हटवला आहे, ज्यामुळे पोलिसांनी 10 मार्चला कामराजला अटक केली होती.

अखेर व्हीडिओ सोशल मीडियावरुन हटवला

या मॉडलने आरोप केला होता की डिलीव्हरी बॅायने Delivery उशीला केल्यामुळे, त्यांच्यात वाद झाला आणि त्यामुळे डिलीव्हरी बॅाय कामराजने तिच्यावर हल्ला केला. मात्र एका पोलिस अधिकाऱ्यांच्या वक्तव्यानुसार डिलीव्हरी बॅायच्या तक्रारीनंतर हितेशा चंद्राणीच्या विरोधात कारवाई केली गेली आणि त्याने हे ही सांगितले की, डिलीव्हरी बॅाय कामराजने असे ही म्हंटले, 9 मार्च रोजी हितेशानेच त्याला चपलीने मारले होते आणि त्याला शिव्यासुद्धा दिल्या होत्या.

डिलिवरी बॉय काय म्हणाला?

कामराजने सांगितले, "मी दोन वर्षापेक्षा अधिक काळापासुन मी हे काम करत आहे आणि मला प्रथमच अशा प्रकारे वागणूक देण्यात आली". तो म्हणाला की, "हितिशाने Delivery घेतली आणि ऑर्डरचे पैसे देण्यास नकार दिला. ती झोमाटो चॅट सपोर्टशी बोलत होती.

मी तिला पैसे देण्यास सांगितले तेव्हा तिने नकार दिला आणि मला गुलाम बोलली...ती एवढ्यावरच न थांबता आरडाओरडा करु लागली आणि म्हणाली तू काय करू शकतोस? झोमाटो सपोर्टने मला सांगितले आहे की माझी ऑर्डर रद्द झाली आहे."

"म्हणून मग मी तिला Food परत करण्यास सांगितले, परंतु तिने मला नकार दिला. यानंतर मी Food न घेताच परत जाण्याचा निर्णय घेतला आणि लिफ्टच्या दिशेने जाऊ लागलो. तेव्हा मला ती हिंदीमध्ये शिव्या देऊ लागली आणि मला चप्पलने मारहाण करायला लागली.

महिलेचा हल्ला टाळण्यासाठी मी माझ्या हाताने माझा बचाव केला. तेव्हा ती माझा हात हटवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तिचाच हात तिला लागला आणि तिच्या हातात असलेली अंगठी तिच्या नाकाला लागली आणि तिच्या नाकातून रक्त यायला लागले."

डिलीव्हरी बॅाय कामराजचे वक्तव्य एकल्यानंतर पोलिसांनी हितेशावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता लवकरच पोलिस सगळ्या गोष्टींची शहाणीशा करुन सत्य समोर आणतील आणि कामराजला न्याय आणि त्याची नोकरी परत मिळेल.