आयकर विभागाकडून ITR फॉर्ममध्ये मोठे बदल

आयटीआर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर

Updated: May 31, 2020, 08:20 PM IST
आयकर विभागाकडून ITR फॉर्ममध्ये मोठे बदल  title=

मुंबई : आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आयकर रिटर्न फॉर्म (ITR) जाहीर केला आहे. यासाठी सरकारने अधिसूचना देखील जाहीर केल्या आहेत. आर्थिक वर्ष २०१९-२० च्या आयटीआर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर आहे.

सात फॉर्म केले जाहीर 

आयकर विभागाने यावेळी सात वेगवेगळे फॉर्म जाहीर केले आहेत. ३० मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या या फॉर्ममध्ये आयटीआर-१ (सहज), आयटीआर-२, आयटीआर-३, आयटीआर-४ (सुगम), आयटीआर-५, आयटीआर-६ आणि आयटीआर-७ यांचा समावेश आहे.

आयकर विभागाने कोविड-१९ या जागतिक महामारीचा विचार करून नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. ITR फॉर्म १ आणि ITR फॉर्म ४ पुन्हा मागवण्यात आले आहेत.  

'ही' माहिती देणं बंधनकारक 

कर भरणाऱ्या व्यक्तीने आयटीआर फॉर्मच्या माध्यमातून काही माहिती देणं बंधनकारक आहे. १ करोडहून अधिक रक्कम जमा असल्यास त्याची माहिती, परदेश दौऱ्यावर २ लाख रुपयांहून अधिक खर्च केला असल्यास त्याची माहिती, एक लाख रुपये अथवा त्यापेक्षा विज बील आलं असल्याची त्याची माहिती, तसेच टॅक्स वाचवण्याकरता २०२० मध्ये केलेली गुंतवणूक या सगळ्या गोष्टींची माहिती देणे बंधनकारक आहे. 

सरकारने यासोबत आयकर कायद्यातील सेक्शन ८०सी, ८०डी आणि ८० जीच्या अंतर्गत गुंतवणूक करण्याची तारीख वाढवून ३० जूनपर्यंत केली आहे. तज्ञांच असं म्हणणं आहे की, त्या व्यक्तींना आयटीआर-१,२ आणि ४ चा लाभ मिळणार नाही. तसेच कर भरणारी व्यक्ती कंपनीत संचालक पदावर असेल ज्यांनी लिस्टिंगमध्ये नाव नसलेल्या इक्विटी शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल. त्यांना काही प्रमाणात सवलत दिली आहे.