राम रहीमला शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ

बाबा राम रहीम याला शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीशांना सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून, त्यांना सुरक्षा देणाऱ्या जवानांच्या संख्येतही वाढ करून ती ४५ वरून ६० करण्यात आली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 18, 2017, 08:19 PM IST
राम रहीमला शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ title=

नवी दिल्ली : बाबा राम रहीम याला शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीशांना सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून, त्यांना सुरक्षा देणाऱ्या जवानांच्या संख्येतही वाढ करून ती ४५ वरून ६० करण्यात आली आहे.

सीबीआय न्यायाधीश जगदीप सिंह यांच्यापुढे राम रहीम प्रकरणाची सुनावनी झाली. राम रहीम याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यावर न्यायालयाने त्याला २० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. यानंतर बाबाच्या अंध भक्तांनी अक्षरश: हौदोस घातला. पंजाब आणि हरियाणात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. यात काही नागरिकांचा बळीही गेला. या सर्व गोष्टींचा विचार करून न्यायाधीशांच्या जिवाला धोका असल्याचे ध्यानात आल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्यांना सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिसांची संख्या ४५ वरून ६० वर नेण्यात आली आहे. डीएसपी रोजेश फोगट हे न्यायाधीश जगदीप सिंह यांचे सुरक्षा प्रमुख असतील. क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंटच्या (सीआयडी) अहवालानुसार न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जगदीप सिंह यांना मुख्यमंत्र्यांची बुलेटप्रुफ कारही देण्यात आली आहे.