रेल्वे अधिकाऱ्याच्या घरावर CBI ची धाड; नोटा मोजून मोजून अधिकारी दमले

उत्तर प्रदेशातील रेल्वेचा एक बडा अधिाकारी CBI च्या जाळ्यात अडकला आहे. CBI ने धाड टाकल्यानंतर या अधिकाऱ्याच्या घरातून 2.61 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आलेय.

वनिता कांबळे | Updated: Sep 13, 2023, 06:41 PM IST
रेल्वे अधिकाऱ्याच्या घरावर CBI ची धाड; नोटा मोजून मोजून अधिकारी दमले title=

CBI Raid News : रेल्वेचा एका बड्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरावर CBI च्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी या रेल्वे अधिकाऱ्याच्या घरात कोट्यावधीचे घबाड सापडले. उत्तर प्रदेशातील या अधिकाऱ्याच्या घरातून 2.61 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आलेय. या अधिकाऱ्याला 3 लाखांची लाच घेतना अटक करण्यात आली होती. यावेळी तपासारदम्यान त्याने लाचखोरीतून जमवलेल्या कोट्यावधीच्या मालमत्तेचा पर्दाफाश झाला आहे. 

कंत्राटदाराकडे मागितली 3 लाखांची लाच

के.सी. जोशी  असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. के.सी. जोशी  ईशान्य रेल्वेचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.  गोरखपूरमधील कंत्राटदारा प्रणव त्रिपाठी नावाच्या व्यक्तीने जोशी लाच मागत असल्याची तक्रार केली होती. एका कामाच्या कॉन्ट्रक्टसाठी जोशी याने त्रिपाठी यांच्याकडे 3 लाखांची लाच मागिती होती. 

रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक

त्रिपाठी यांनी जोशी याच्या लाचखोरीबाबत तक्रार केली होती. त्यानुसार लाच म्हणून देण्यात येणारी 3 लाखांची रोडक त्रिपाठी याने जोशी यांच्या सरकारी बंगल्यावर पाठवली. यावेळी अॅन्टीकरप्शनने 3 लखांची रोकड ताब्यात घेतली. यानंतर CBI ने जोशी यांच्या घरावर छापेमारी केली.

CBI च्या छापेमारीत सापडली  2.61 कोटींची रोकड

CBI च्या छापेमारीत जोशी यांच्या यांच्या घरातून   2.61 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आलेय. CBI अधिकाऱ्यांनी जोशी यांच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी CBI अधिकऱ्यांना 500 रुपांच्या नोटांचे बंडल सापडले. या नोटांचू मोजदाद केली असता एकूण 2.61 कोटींची रोकड जोशी यांच्या घरात सापडली आहे. हा सर्व पैसा जोशी यांनी चालखोरीतून गोळा केला असल्याचा संशय CBI अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जोशी यांनी अटक करण्यात आली असून त्यांच्या सर्व मालमत्तेचा तपास केला जात आहे. तपासादरम्यान जोशी याच्याकडे आणखी घबाड सापडेल अशी शक्यता CBI अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेय.  या कारवाईमुळे गोरखपुर रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. के.सी. जोशी 1988 च्या बॅचचा  IRSS अधिकारी आहे.