मेहुल चोक्सीच्या मुसक्या आवळणार या लेडी सिंघम

फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी  (Mehul Choksi) प्रकरणी डोमिनिका उच्च न्यायालयात (Dominica High Court) आज पुन्हा सुनावणी होणार आहे. 

Updated: Jun 3, 2021, 08:29 AM IST
मेहुल चोक्सीच्या मुसक्या आवळणार या लेडी सिंघम title=

मुंबई : फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी  (Mehul Choksi) प्रकरणी डोमिनिका उच्च न्यायालयात (Dominica High Court) आज पुन्हा सुनावणी होणार आहे. भारत चोक्सीला प्रत्यार्पणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. हे पाहता डोमिनिका येथे एक पथक तळ ठोकून आहे, ज्याची कमांड सीबीआय अधिकारी शारदा राऊत (Sharda Raut) यांच्याकडे आहे. राऊत या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याच्या चौकशीचे नेतृत्व करीत आहेत आणि मेहुल चोक्सी याला परत आणण्याच्या मोहिमेसाठी मोलाची भूमिका बजावत आहेत.

2005 Batchच्या आयपीएस अधिकारी

शारदा राऊत डोमिनिकामध्ये असून सीबीआयच्या अन्य अधिकाऱ्यासह 6 अधिकारी आहेत. ‘इंडिया टुडे’ च्या वृत्तानुसार, डोमिनिका कोर्टाने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिल्यास त्याला भारतीय अधिकारी खासगी विमानाने नवी दिल्ली आणतील. चोक्सीला भारतात आणणार्‍या टीमचे नेतृत्व शारदा राऊत करत आहेत. राऊत हे महाराष्ट्रातील 2005 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 

डोमिनिका कोर्टात युक्तिवाद

सुनावणीत भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी डोमिनिका प्रशासनाबरोबर अनेक फेऱ्यांत चर्चा केल्या आहेत. मेहुल चोक्सीच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती सोबतच टीमने डोमिनिका कोर्टात ईडीचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. या कागदपत्रांद्वारे सांगण्यात आले की चोक्सी हा भारताचा नागरिक आहे. भारतीय टीम कोर्टाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे की, डोमिनिकाच्या ताब्यात असलेली व्यक्ती जानेवारी 2018 पासून भारताला हवी आहे आणि इंटरपोलने दिलेल्या रेड नोटीसच्या आधारे त्याला त्वरित भारतात सुपूर्द केले जावे.

भारतीय नागरिकत्व सोडले नाही

आजच्या सुनावणीत भारतीय टीम मेहुल चोक्सी याने नोव्हेंबर 2017 मध्ये अँटिगाचे नागरिकत्व घेतले असा युक्तिवाद सादर करेल, परंतु त्याने आजपर्यंत आपले नागरिकत्व  (Indian Citizenship) सोडले नाही. तर तो अजूनही भारतीय नागरिक आहे. या पथकाचे नेतृत्व करणारी सीबीआय अधिकारी शारदा राऊतही पालघरच्या एसपी राहिल्या आहेत. असे सांगितले जात आहे की, त्यांनी या गुन्ह्यावर बर्‍याच अंशी नियंत्रण ठेवले होते. याशिवाय त्या नागपूर, मीरा रोड, नंदूबार, कोल्हापूर, मुंबई अशा अनेक ठिकाणी काम केले आहे.