CBSE 10-12th Result 2021: 10वी आणि 12वीचे निकाल कधी; महत्त्वाचे अपडेट

कधी जाहीर होणार सीबीएसई 10 वी आणि 12 वीचे निकाल? 

Updated: Jul 20, 2021, 07:21 AM IST
CBSE 10-12th Result 2021: 10वी आणि 12वीचे  निकाल कधी; महत्त्वाचे अपडेट title=

मुंबई : सध्या  सर्वत्र 10 वी आणि 12 वीच्या निकालाची चर्चा आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सरकरने 10 वी आणि 12 वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा  रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द केल्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय सरकारने घेतला. अशात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)  10 वी आणि 12 वीचे  निकाल लवकरचं घोषित  करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक देखील निकालांच्या  प्रतीक्षेत आहेत. 

एएनआयशी बोलताना सीबीएसई परीक्षा नियंत्रक सन्याम भारद्वाज यांनी माहिती दिली होती की, 'सीबीएसई 10 वीचे निकाल 20 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. 12 वीचे निकाल 2021 महिन्याअखेरीस  जाहीर केले जातील.' विद्यार्थांना त्यांचे निकाल cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे. 

गेल्यावर्षी ज्याप्रमाणे बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी निकाल पाहिले, त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षा देखील विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहाता येणार आहेत. एकाचं वेळी लाखो विद्यार्थी  निकाल पाहाणार असल्यामुळे साईट क्रॅश  होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 10वीचे निकाल 20 जुलै जाहीर होणार आहेत तर 12 वीचे निकाल 23 जुलै रोजी जाहीर होणार आहेत. 

सांगायचं झालं तर, 2020 मध्ये, दहावीचा निकाल 15 जुलै रोजी जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षी जेव्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग  वाढत होता तेव्हा दिल्लीतील काही शहरांमध्ये बोर्डाच्या परीक्षा झाल्या होत्या, तर काही ठिकाणी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. पण 12 वीच्या परीक्षा झाल्याचं नाहीत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय सरकारने घेतला.