सीबीएसई 2019 : दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१९ तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१९ या कालावधीत 

& Updated: Dec 23, 2018, 11:01 PM IST
सीबीएसई 2019 : दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर title=

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसईच्या या दोन्ही परीक्षा येत्या वर्षात फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. बोर्डातर्फे रविवारी संध्याकाळी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१९ तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१९ या कालावधीत होणार आहे. 

सीबीएसईने दोन्ही परीक्षांचे वेळापत्रकही आपल्या साईटवर जाहीर केले आहे. 10 वीच्या परीक्षेची सुरुवात गणिताच्या पेपरने होणार आहे. तर 12 वीची परीक्षा कॉमर्स, सायन्स, आर्ट्स स्ट्रीमनुसार होणार आहे. वेबसाईटवर माहीती जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांनी साईटवर गर्दी केली. एकावेळी अनेक विद्यार्थी आल्याने साइट ओपन होण्यास वेळ जात होता. 

सीबीएसईच्या दोन्ही परीक्षा यावर्षी सकाळच्या सत्रात होणार आहेत. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10.30 ते दु.1.30 पर्यंत हे पेपर होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजता हजर राहावे लागणार आहे. वेगवेगळ्या परीक्षांची तारीख, बोर्ड एकाचवेळी येऊ नयेत याची बोर्डाने काळजी घेतली आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षांचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहेत.