मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसईचे १२वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दुपारी १२.३० वाजता हा निकाल साईटवर दिसू लागला आहे. यामध्ये गाझियाबादची मेघना श्रीवास्तवने ५०० पैकी ४९९ गुण मिळवत अव्वल आली आहे. ८३.१ टक्के इतका यंदाचा सीबीएसईचा निकाल लागला आहे. त्यामुळे यंदा १ टक्क्याने निकाल वाढल्याचे दिसून येत आहे. त्रिवेंद्रमचा 97.3 टक्के, चेन्नईचा 93.8 7 टक्के तर दिल्लीचा 89 टक्के निकाल लागला आहे. सीबीएसईचं संकेतस्थळ, विविध अॅप्स आणि एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. सीबीएसई डॉट एनआयसी डॉट इन (cbse.nic.in) आणि सीबीएसईरिझल्ट्स डॉट एनआयसी डॉट इन (cbseresults.nic.in) या मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल दिसतील. अँड्रॉईड, मायक्रोसॉफ्ट आणि आयएसओ सिस्टिमच्या मोबाईलमध्ये विविध अॅप्सद्वारेही निकाल पाहता येतील.