Nitin Gadkari On Toll Tax : "6 महिन्यांत टोल प्लाझा बंद....." : नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadakari) यांनी राज्यसभेत टोल प्लाझाबाबत (Toll Plaza) मोठं वक्तव्य केलंय.   

Updated: Aug 3, 2022, 06:37 PM IST
Nitin Gadkari On Toll Tax : "6 महिन्यांत टोल प्लाझा बंद....." : नितीन गडकरी title=

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadakari) यांनी राज्यसभेत टोल प्लाझाबाबत (Toll Plaza) मोठं वक्तव्य केलंय. येत्या 6 महिन्यांमध्ये टोल प्लाझा बंद करण्याचा प्रयत्न असल्याचं गडकरींनी म्हटलंय. संसंदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत त्यांनी टोल प्लाझाबाबत हे वक्तव्य केलंय. (central cabinet minister nitin gadkari to try to close toll plazas in 6 months)

गडकरी काय म्हणाले?

"आमचा टोलसाठी तीन प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा विचार सुरू आहे. तसेच जेवढा प्रवास तेवढाच टोल आकारणार आहोत. पहिला प्रकार हा वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणांबाबत आहे. तर दुसरा पर्याय हा आधुनिक नंबर प्लेट संबंधित आहेत. आम्ही काही महिन्यांपासून नंबर प्लेटच्या पर्यायावर भर देतोय. तर येत्या महिन्याभरात आणखी एखादा पर्याय समोर येण्याची अपेक्षा आहे", असं  गडकरींनी आपल्या उत्तरात नमूद केलं.

"या नव्या तंत्रज्ञानामुळे टोल नाक्यावर गर्दी होणार नाही. तसेच वाहतुकीवरही कोणताही परिणाम होणार नाही", असा विश्वासही गडकरी यांनी यावेळेस व्यक्त केला.

सध्याचा नियम काय सांगतो?

"एखाद्या वाहनचालकाला टोल रोडवर 10 किलोमीटर प्रवास केल्यानंतरही 75 किलोमीटरचे पैसे टोल म्हणून द्यावे लागतात. मात्र नव्या प्रणालीनुसार आता जितका प्रवास तेवढाच टोल द्यावा लागणार आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली." 

"भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होतील"  

"भारतात 2024 आधी 26 ग्रीन एक्स्प्रेसवे सुरू होतील. ज्यामुळे भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेच्या बरोबरीने असेल. रस्त्यांच्या निर्मितीमुळे 2 शहरांमधील अंतर आणखी कमी होईल", असंही गडकरींनी नमूद केलं.