ATM Cash Withdrawal च्या नियमात मोठा बदल, आत्ताच जाणून घ्या, नाहीतर...

बँकेकडून सर्वसाधारपणे एका महिन्यात Cash Withdrawal  मर्यादा आहे. मात्र या मर्यादेनतंर आता तुम्हाला अधिकच पैसे मोजावे लागणार आहेत.

Updated: Aug 19, 2022, 08:38 PM IST
ATM Cash Withdrawal च्या नियमात मोठा बदल, आत्ताच जाणून घ्या, नाहीतर... title=

मुंबई :  बँकेकडून सर्वसाधारपणे एका महिन्यात Cash Withdrawal  मर्यादा आहे. मात्र या मर्यादेनतंर आता तुम्हाला अधिकच पैसे मोजावे लागणार आहेत. एकूण 4 बँकाकडून  ATM Cash Withdrawal  च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. (SBI, PNB, HDFC Bank, ICICI, Axis Bank) नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता खातेधारकांना किती रुपये अधिकचे मोजावे लागतील हे जाणून घेणार आहोत.  

कोणत्या बँकेचा काय दर आहे? जाणून घ्या...

 

SBI

जर तुम्ही मेट्रो शहरामध्ये राहत असाल तर तीन वेळा मोफत विड्रॉल शकता. एसबीआय एटीएममधून 3 पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर तुम्हाला 10 रुपयांची एक्स्ट्रा फी भरावी लागते. इतर बँकेच्या एटीएमद्वारे मोफत मर्यादेपेक्षा जास्त वेळा विड्रॉ केल्यावर प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 20 रुपयांची फी भरावी लागते. याव्यतिरिक्त, खातेदारांकडून जीएसटी (GST) देखील आकारला जातो.  

PNB

PNB एटीएमद्वारे 5 वेळा मोफत ट्रांजेक्शन देतं. त्यासोबतच, कोणत्याही फायनांशिअल ट्रांजेक्शनसाठी 10 रुपयांची फी भरावी लागते. मेट्रो सिटीमध्ये एका महिन्यात केवळ 3 ट्रांजेक्शन आणि नॉन मेट्रो सिटीमध्ये 5 फ्री ट्रांजेक्शन करता येतं. पीएनबीच्या व्यतिरिक्त इतर बँकांच्या एटीएममधून ट्रांजेक्शनसाठी वेगळे नियम आहेत. फ्री लिमिटपेक्षा जास्तीच्या फायनांशिअल किंवा नॉन फायनांशिअल ट्रांजेक्शनसाठी 20 रुपयांची फी भरावी लागते.

HDFC Bank 

एका महिन्यात HDFC बँकेच्या एटीएममधून केवळ 5 वेळा मोफत ट्रांजेक्शन करता येतं. रोख पैसे काढण्यासाठी प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 20 रुपये अधिक जीएसटी, नॉन फायनांशिअल ट्रांजेक्शनसाठी 8.5 रुपये अधिक जीएसटी. 6 मेट्रो शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरू) इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये 3 फ्री ट्रांजेक्शनसाठी परवानगी आहे आणि महिनाभरात इतर ठिकाणी 5 मोफत ट्रांजेक्शेन (फायनांशिअल आणि नॉन फायनांशिअल ट्रांजेक्शन) करण्याची परवानगी आहे. इतर बँकेच्या एटीएम किंवा मर्चंट आउटलेटमध्ये पुरेशी शिल्लक, जर व्यवहार नाकारला गेला, तर रु.25 चे शुल्क भरावे लागेल.

ICICI 

एका महिन्यात ICICI एटीएममधून 5 वेळा मोफत ट्रांजेक्शन करता येते. त्यांनंतर एटीएम विड्रॉलवर 20 रुपये अधिक जीएसटी द्यावे लागते. ही मर्यादा फायनांशिअल ट्रांजेक्शनसाठी आहे, त्यासोबतच नॉन फायनांशिअल ट्रांजेक्शनसाठी 8.50 रुपये अधिक जीएसटी आहे. 

Axis Bank

एक्सिस बँकच्या एटीएममधून एका महिन्यात 5 वेळा ट्रांजेक्शन मोफत आहेत. मेट्रो शहरांमध्ये फायनांशिअल आणि नॉन फायनांशिअल 3 ट्रांजेक्शन मोफत आहेत. इतर ठिकाणी एका महिन्यात 5 ट्राजेक्शन मोफत आहेत. मर्यादेपेक्षा जास्त वेळा एक्सिस आणि नॉन एक्सिस एटीएममधून कॅश विड्रॉल केली तर प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 21रुपये मोजावे लागतील.

मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळूरु आणि हैद्राबाद या सहा मेट्रो शहरांच्या बँक एटीएमद्वारे 3 ट्रांजेक्शन मोफत आहेत. यामध्ये फायनांशिअल आणि नॉन फायनांशिअल ट्रांजेक्शन दोन्हींचाही समावेश आहे. नॉन मेट्रो शहरांमध्ये 5 वेळा एटीएमद्वारे ट्रांजेक्शन करु शकता. यानंतर मेट्रो शहरांमध्ये फायनांशिअल ट्रांजेक्शन केल्यावर प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 20 रुपये आणि 8.50 रुपये नॉन फायनांशिअल ट्रांजेक्शनसाठी मोजावे लागत होते, जे आता 21 रुपये झाले आहेत. 

यामुळे वाढली ट्रांजेक्शन फी

एटीएम मशीन लावणे आणि त्याच्या देकरेखीसंबंधीत बँकेचा खर्च वाढल्याने ट्रांजेक्शन फी वाढवण्यात आली आहे.