नक्षल्यांच्या लॅंडमाइन ब्लास्टमध्ये 2 जवान जखमी

ओडिसातील मलकानगिरी जिल्ह्यात नुकताच एक लॅंडमाइन ब्लास्ट झाला आहे. 

Updated: May 11, 2019, 01:18 PM IST
नक्षल्यांच्या लॅंडमाइन ब्लास्टमध्ये 2 जवान जखमी

छत्तीसगड : ओडिसातील मलकानगिरी जिल्ह्यात नुकताच एक लॅंडमाइन ब्लास्ट झाला आहे. हा जिल्हा छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याला लागून असलेल्या सीमावर्ती भागात येतो. या ब्लास्टमध्ये एसओदीचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. मनकानगिरीचा हा ब्लास्ट नक्षलवाद्यांनी घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. 

सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या हल्ल्यानंतर अधिकारी सतर्क झाले आहेत. नक्षल्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू आहे.