Cm Shinde On Sanjay Raut : "फक्त 50? खोके म्हणजे......", राऊतांची टीका, शिंदेंचं प्रत्युत्तर

Cm Shinde on Sanjay Raut : 50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा. गुलाबराव जुलाबराव होतील आणि 40 जणांना थोड्याच दिवसात जुलाब होतील, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती.

संजय पाटील | Updated: Jul 9, 2022, 04:37 PM IST
Cm Shinde On Sanjay Raut : "फक्त 50? खोके म्हणजे......", राऊतांची टीका, शिंदेंचं प्रत्युत्तर title=

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. भेटीगाठी झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदेंनी या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केलेल्या 50 खोक्यांच्या टीकेवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. (chief minister eknath shinde critisized to shiv sena mp sanjay raut over to 40 reble mla statement at delhi)

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"फक्त 50? खोके म्हणजे कसले खोके, मिठाईचे का? ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकही इथून तिथे जायला विचार करतो. हे 50 आमदार (40+10) 3-4 लाख लोकांमधून निवडून आले आहेत. या आमदारांना गेल्या अडीच वर्षात आपल्या मतदारसंघात विकासकामं करता आली नाहीत. त्यांच्यावर अशी परिस्थिती या आमदारांवर ओढावली" असं शिंदे यांनी नमूद केलं. 

"बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. आम्हाला सभागृहात सावरकरांबाबत बोलता येत नव्हतं. बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट घडवला. त्याच्या विरोधात कारवाई करता येत नाही. बाळासाहेबांच्य औरंगाबादचं  संभाजीनगर करण्याबाबतची घोषणा ही आम्ही तगादा लावल्यानंतर शेवटीशेवटी पूर्ण केली. त्या निर्णयाचं स्वागत आहे", असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

आमचं बंड नाही अनन्यायाविरोधातील उठाव 

"बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरोधात आवाज उठावायला आणि पेटून उठायला शिकवलंय. आम्ही जे केलंय ते बंड नाही. ही गद्दारीही नाही. ही एक क्रांती आहे. पक्षातील एक उठाव आहे. सर्व आमदार हे स्वत:हून आले आहेत. हे आमदार पैशाने विकणारे नाहीत. त्यांच्याकडे आता आरोप करायला काहीच नाही. त्यामुळे ते आरोप करत बसतील"अशा शब्दात शिंदेंनी राऊतांच्या टीकेला प्रत्तुयत्तर दिले.

संजय राऊत काय म्हणाले होते? 

"50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा. गुलाबराव जुलाबराव होतील आणि 40 जणांना थोड्याच दिवसात जुलाब होतील, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. शिवसेना सोडताना तुम्ही 10 कारणे दिलीत. मात्र, ही कारणं चुकीची आहेत. तुम्ही भाजपचे झालात. तुम्हाला जायचे होते, म्हणून गेलात. कारण शोधत आहात. आताचे मुख्यमंत्री हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत", असा घणाघात राऊत यांनी केला होता.