मोबाईल कंपन्यांवर छापेमारी केल्याने चीनी भडकले; म्हटले, भारतात व्यवसायीक वातावरण कठोर

भारतात चीनी कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याने त्यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीवर चीनने हरकत नोंदवली आहे.

Updated: Dec 25, 2021, 11:02 AM IST
मोबाईल कंपन्यांवर छापेमारी केल्याने चीनी भडकले; म्हटले, भारतात व्यवसायीक वातावरण कठोर title=

मुंबई : भारतात चीनी कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याने त्यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीवर चीनने हरकत नोंदवली आहे. न्यूज एजेंसी IANS ने दिलेल्या माहितीनुसार, चीनी सकारचे मुखपत्र असेलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये चीनी विश्लेषकांनी म्हटले की, भारत सरकारने देशातील चीनी कंपन्यांच्या योग्य अधिकारांचे आणि हितांचे संरक्षण करायला हवे. आयकर विभागाच्या छापेमारीवर चीनने नाराजी व्यक्त केली आहे.

चीनी विश्लेषकांचे मत

चीनी कंपन्यांनी आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले आहे. की, छापेमारीनंतर काही अडचणी नक्कीच आल्या आहेत. परंतू अद्याप याबाबतची चौकशी सुरू आहे. चीनी विश्लेषकांनी म्हटले की, भारतातील व्यवसायीक वातावरण फक्त चीनी कंपन्यांसाठीच नव्हे तर, सर्व विदेशी कंपन्यांसाठी अधिक कठोर आहे. पाश्चमात्त कंपन्या त्यामुळे याआधी देशातून बाहेर गेल्या आहेत.

खबरदारी घेण्याचा सल्ला

चीनी विश्लेषकांनी चीनी कंपन्यांना भारतात गुंतवणूक आणि व्यापार करताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच ते म्हटले की, कंपन्यांनी स्थानिक नियमांचे काटेकोर पालन करायला हवे. जेणे करून भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची संधी मिळू नये

ओप्पो - शाओमीवर छापेमारी

आयकर विभागाने गेल्या गुरूवारी ओप्पो(oppo)आणि शाओमी (Xiaomi)शी संबधीत राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (NCR),मुंबई, राजकोट आणि कर्नाटकात 20 हून जास्त परिसरामध्ये छापेमारी केली होती. चीनी कंपनी वनप्लसच्या कार्यालयातही छापेमारी करण्यात आली होती.